Type Here to Get Search Results !

मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने जळगावात २० जणांच्या मोतीबिंदूवर यशस्वी शस्त्रक्रिया




 पहूर प्रतिनिधी- ता जामनेर  

दिशा लाईव्ह न्यूज---:::--- राज्याचे जलसंपदा  व  आपत्तीव्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षाच्या पुढाकाराने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (GMC) विशेष मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जामनेर तालुक्यातील २० गरजू रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.


                  ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा

या शिबिराचा लाभ प्रामुख्याने जामनेर तालुक्यातील पहूर, पाळधी आणि लोंढरी येथील रुग्णांनी घेतला. ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या रुग्णांना डोळ्यांच्या आजारावर उपचार मिळावेत, या उद्देशाने या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

                        तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग

शासकीय रुग्णालयातील अनुभवी नेत्रशल्यचिकित्सकांनी या शस्त्रक्रिया पार पाडल्या. यामध्ये प्रामुख्याने खालील डॉक्टरांच्या पथकाचा समावेश होता:



नेत्रशल्यचिकित्सक: डॉ. प्रविण पाटील, डॉ. मयुरी राठोड, डॉ. राधीका दरक, डॉ. मयुरेश डोंगरे, डॉ. सोबीया अन्सारी, डॉ. स्वाती आसोले आणि डॉ. प्रियंका पाटील.

नेत्रचिकित्सा अधिकारी: विलास बाविस्कर, भारती वाणी आरव आराक, गौरव चौधरी.

सहाय्यक कर्मचारी: सुनिता वक्ते, भाग्यश्री ढाकणे, वैष्णवी दांडगे, हीरा पालवी.

                        नियोजन आणि समन्वय

या संपूर्ण उपक्रमाचे नेटके नियोजन 'गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षाचे' समन्वयक आरोग्यदूत पै.शिवाजी पाटील यांनी केले. रुग्णांची तपासणी, त्यांना रुग्णालयापर्यंत आणणे आणि शस्त्रक्रियेनंतरची सुश्रुषा या सर्व बाबींकडे त्यांनी विशेष लक्ष दिले.

मोफत शस्त्रक्रिया आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपचारामुळे रुग्णांनी समाधान व्यक्त केले असून, मंत्री गिरीश महाजन यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments