दिशा लाईव्ह न्यूज---:::----द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने येत्या ३१ मार्च २०२६ रोजी पंढरपूर येथे भव्य असा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा-2026 आयोजित करण्यात आला आहे.
समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना या सोहळ्यात प्रतिष्ठित राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
या सोहळ्यात महाराष्ट्र समाज भूषण, आदर्श पत्रकार, आदर्श शिक्षक, सेवा धन्वंतरी भूषण, कृषी भूषण, कलारत्न भूषण, कलाभूषण, गानसम्राज्ञी, साहित्यभूषण, अभियंता भूषण, भारत भूषण, आदर्श माता, शौर्य पुरस्कार, पर्यावरण पुरस्कार, वृक्षारोपण पुरस्कार, साहित्यरत्न, काव्य भूषण, आदर्श लेखक, आदर्श ग्रामसेवक, वृक्षमित्र, पर्यावरण रक्षक, आरोग्यदूत, आदर्श आरोग्य सेवा, क्रीडारत्न, नारिशक्ती, उंच माझा झोका, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महाराष्ट्र रत्न, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे, माता रमाई, राजमाता जिजाऊ, जीवन गौरव, महाकवी वामनदादा कर्डक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, कीर्तनकार गौरव, अध्यात्मश्री, वारकरी गौरव अशा अनेक मानाच्या पुरस्कारांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.
सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, वैद्यकीय, पत्रकारिता, पोलिस सेवा तसेच देशसेवेसाठी योगदान देणारे सैनिक, युवा वर्ग आणि शौर्य दाखवणाऱ्या बालकांनाही या कार्यक्रमात राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे भगवंत पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभ आणि कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण :संतराज पॅलेस, विसावा मंदिराशेजारी, बुलेट शोरूम समोर, पुणे रोड, पंढरपूर* येथे असून मंगळवार दि. ३१ मार्च २०२६ रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत हा सोहळा पार पडणार आहे.
पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्तींनी आपले नाव, मोबाईल नंबर, पत्ता, कार्याची थोडक्यात माहिती, आधार कार्ड, ई-मेल आयडी आणि एक आयडेंटीकार्ड साईज फोटो पीडीएफ ही माहिती २० मार्च २०२६ पूर्वी पाठवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या तारखेनंतर येणाऱ्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही.
अधिक माहितीसाठी शकील मनियार (राज्य अध्यक्ष, द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य) यांच्याशी मो. 9960168671 तर द युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जळगांव जिल्हाध्यक्ष दिनेश चौधरी-9309918930 ,भडगाव येथील तालुका सचिव हर्षल धर्मराज चौधरी +919975537836 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा व्हॉट्सअॅपद्वारे माहिती पाठवावी.


Post a Comment
0 Comments