Type Here to Get Search Results !

पहूर बस स्थानक परिसर सीसीटीव्हीच्या कक्षेत! पोलीस प्रशासनाने बसवले आठ कॅमेरे


पहूर, प्रतिनिधी-:-ता. जामनेर :

दिशा लाईव्ह न्यूज--::----जळगाव–छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३-एफवरील पहूर येथील दादासाहेब कॅप्टन डॉ. एम. आर. लेले बस स्थानक परिसर आता पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीत आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांच्या हस्ते या कॅमेऱ्यांचे उद्घाटन करून यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.



राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवणे, परिसरात वाढलेल्या चोऱ्यांना आळा घालणे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे या उद्देशाने ही सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात या यंत्रणेचे लोकार्पण करण्यात आले. परिसरात एकूण आठ कॅमेरे बसविण्यात आले असून येथील सर्व हालचाली थेट पोलीस ठाण्यातील अधिकारी कक्षातून पाहता येणार आहेत.




सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांनी सांगितले की, वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही यंत्रणा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे संशयास्पद हालचालींवर तत्काळ लक्ष ठेवणे शक्य होणार असून गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होईल.


दरम्यान, यापूर्वी पहूर कसबे ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत यासाठी सामाजिक कार्यकर्ते ईश्वर हिवाळे यांनी पत्रव्यवहार केला होता. मात्र ग्रामपंचायतीकडून पुढाकार न झाल्याने आता पोलीस प्रशासनानेच पुढाकार घेत ही यंत्रणा कार्यान्वित केली असून त्यामुळे परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यास मोठी मदत होणार असल्याचे नागरिकांचे मत आहे.

Post a Comment

0 Comments