Type Here to Get Search Results !

जळगांव जिल्हा महिला अध्यक्षपदी सौ.अनिता चौधरी यांची निवड--मान्यवरांकडून शुभेच्छाचा वर्षाव.


दिशा लाईव्ह न्यूज---:::---आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना, ग्लोबल पीस कौन्सिल, भारतीय महाक्रांती सेना व यू.एन. न्यूज २४ संलग्न असलेल्या माहिती अधिकार, पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेच्या जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी सौ. अनिता राजेंद्र चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली आहे.


या नियुक्तीची घोषणा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश शिंदे, राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी प्रविण अतेक काकडे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तुळशीराम जांभुळकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष अफसर कुरेशी, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष किलोर घोळवे , महाराष्ट्र राज्य संघटक जयंतराव धांडे तसेच महिला प्रदेश अध्यक्ष शिल्पा बनपुरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली.


नियुक्तीपत्रात नमूद केल्यानुसार, सौ. अनिता चौधरी यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य, लोकांशी असलेला संवाद व विविध प्रश्नांवर केलेले कार्य लक्षात घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. माहिती अधिकार, पत्रकारिता व पोलिस मित्र संघटनेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांचे प्रश्न लोकशाही पद्धतीने सोडविणे तसेच संघटनेची विचारधारा प्रभावीपणे पुढे नेणे ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.


तसेच संघटनेच्या नियमांचे पालन करत भारतीय संविधान व कायद्यांचा आदर राखून सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय व हक्कासाठी कार्य करण्याची अपेक्षा नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आली आहे. शाश्वत विकासाच्या दृष्टीने समाजातील विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून सक्रियपणे काम करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

 दरम्यान, सौ. अनिता चौधरी यांच्या निवडीबद्दल सामाजिक, पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments