Type Here to Get Search Results !

तेली समाजासाठी स्थापन झालेले आर्थिक विकास महामंडळ लवकर सुरु करण्यात यावे. मागणीसाठी खान्देश तेली समाज मंडळाचे धरणे आंदोलन!!


दिशा लाईव्ह न्यूज---:::--- - विधानसभा निवडणूकीपूर्वी तेली समाजासाठी स्थापन झालेले आर्थिक विकास महामंडळ लवकरात लवकर सुरू करण्यात यावे या मागणीसाठी खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने अध्यक्ष कैलास आधार चौधरी व सचिव रवींद्र जयराम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आज क्युमाईन क्लब जवळ धरणे आंदोलन करण्यात आले.


विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळांची स्थापना केलेली होती.निवडणुकीनंतर सर्व आर्थिक विकास महामंडळे कार्यरत होतील असे आश्वासन देखील दिलेले होते.मात्र,विधानसभा निवडणुका संपून दीड वर्ष झाले तरी अद्याप महामंडळे सुरू झालेली नाहीत.

शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार  तेली समाजासाठी स्थापन झालेले आर्थिक विकास महामंडळ  लवकरात लवकर सुरू करावे अशा मागणीचे निवेदन मा.जिल्हाधिकारी धुळे यांचे मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले.सदरचे महामंडळ लवकरात लवकर सुरू न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे देखील निवेदनात सुचित करण्यात आले आहे.


तेली समाजातील गरजवंत समाज बांधवांसाठी या आर्थिक विकास महामंडळाची आवश्यकता असून,तेली समाजाच्या व्यवसायाला चालना मिळणे,रोजगाराच्या संधी निर्माण होणे,आर्थिक दुर्बल घटकाला सशक्त करणे,तेली समाजासाठी विशेष योजनांची अंमलबजावणी करणे,शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी आर्थिक मदत करणे,महिला सक्षमीकरण साठी विशेष योजना सुरू करणे,ग्रामीण भागातील तेली समाजाच्या विकासासाठी काम करणे,तेली समाजाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक विकासासाठी काम करून नवतरुण व उद्योजकांना बिनव्याजी कर्ज मिळावे,तसेच तेली समाजातील उद्योजकांना प्रोत्साहन देणे,आर्थिक गरज असलेल्या गरजवंत समाज बांधवांना मदत करणे यासाठी आर्थिक विकास महामंडळाची गरज असून ते लवकरात लवकर कार्यरत करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.



आजच्या धरणे आंदोलनामध्ये खान्देश तेली  समाज मंडळा सहित संपूर्ण तेली समाजातील समाज बंधू भगिनी यांनी सहभाग नोंदविला.यावेळी मंडळाचे सचिव रवींद्र जयराम चौधरी यांनी मागणी संदर्भात माहिती देऊन या आंदोलनाची दखल न घेतल्यास एक मे महाराष्ट्र दिनी अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला.

यावेळी डी.डी.महाले सर पिंपळनेर,सुभाष जाधव, अशोक छगन चौधरी,पोपटराव डोंगर चौधरी,नरेशआप्पा चौधरी, विलास आण्णा चौधरी,जयवंत रामदास चौधरी,आर.डी.चौधरी चाळीसगाव,ओबीसी महासंघाचे भटू पुंडलिक नेरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.आजच्या आंदोलनास मधुकर यादव चौधरी मालेगाव तेली समाज,माजी महापौर सौ.कल्पनाकाकू महाले,सौ.प्रतिभाताई चौधरी,सुनील काका महाले,नगरसेविका सौ.संध्या कांबळे,श्री महामंडलेश्वर पार्वती जोगी,बबनबापू थोरात,माजी नगरसेवक कैलास काळू चौधरी,निलू पार्वती जोगी,शुभांगी निलू जोगी,धनगर तेली समाजाचे आण्णा खेमनार,धुळे जिल्हा युवक मंडळ अध्यक्ष मिलिंद रवींद्र चौधरी,रमेश आण्णा श्रीखंडे,पितांबर दादा महाले,चाळीसगाव तेली समाज,नेर तेली समाज,दि बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया,राजुनाना चौधरी, सुनील नथ्थू चौधरी,किशोर काळू चौधरी,डॉ.सोमनाथ चौधरी,गणेश चौधरी,कमलेश देवरे यांनी पाठिंबा दिला.


धरणे आंदोलनामध्ये विभागीय उपाध्यक्ष राजेंद्र माधवराव बागुल,शहर अध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी,सचिव किशोर पुंडलिक चौधरी,जळगाव जिल्हा अध्यक्ष सोनू भटू चौधरी,कार्याध्यक्ष मनोज मधुकर चौधरी,शहर उपाध्यक्ष चंद्रकांत श्रीराम चौधरी,प्रमोद महादू चौधरी,खजिनदार राजेंद्र भाईदास चौधरी,संघटक नितीन मोतीलाल चौधरी,चोपडा तालुका अध्यक्ष प्रकाश शंकर चौधरी,चाळीसगाव अध्यक्ष सुनील भाऊ चौधरी,जळगाव जिल्हा सचिव प्रशांत चौधरी चाळीसगाव,तेली युवक मंडळ जिल्हाध्यक्ष मिलिंद रवींद्र चौधरी,धुळे तालुकाध्यक्ष सुनील भारत चौधरी,जळगाव तालुका अध्यक्ष शैलेश चौधरी,किरण श्रीराम बागुल,अमोल हिरामण चौधरी,नटराज बाबूलाल चौधरी,गजानन एकनाथ चौधरी,भाऊसाहेब चौधरी वरखेडी,श्याम रामदास चौधरी,छोटू श्रावण चौधरी,राजेंद्र गणपत चौधरी,अतुल सुरेश वाघ, चोपडा शहर अध्यक्ष विनोद शांताराम चौधरी,भुपेंद्र भटा चौधरी,जनार्दन देवराम चौधरी,सतिश दिपचंद चौधरी,मुकेश श्रीराम चौधरी,पंकज संतोष चौधरी,राजेंद्र धोंडू चौधरी,किरण चौधरी,गजेंद्र फुलचंद चौधरी,तुषार भिमराव चौधरी,अरुण भगवान चौधरी,नंदलाल रमेश चौधरी,कृष्णा थोरात,सुनील दिलीप चौधरी,जिभाऊ मंगा चौधरी, जगन्नाथ शंकर चौधरी,कैलास रतन बोरसे,रविंद्र वसंत चौधरी यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदवला.

Post a Comment

0 Comments