दिशा लाईव्ह न्यूज---:::---महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आयोजित करिअर कट्टा अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी आप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य डॉ. संजय वामनराव भोळे यांना उत्कृष्ट प्राचार्य व प्रा. डॉ.योगिता चौधरी यांना उत्कृष्ट समन्वय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे.
करिअर कट्टा या उपक्रमा अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात ज्यामध्ये आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन , व्यावसायिक शिक्षणा संदर्भात मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा अशा विविध उपक्रमाच्या माध्यमातून करियर कट्टा या अंतर्गत महाविद्यालयात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची नोंद घेऊन
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र, मुंबई आयोजित अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला 2026 या शैक्षणिक वर्षात सलग चार पारितोषिके मिळालेले आहेत .
ज्यामध्ये उत्कृष्ट प्राचार्य म्हणून प्रा. डॉ.संजय वामनराव भोळे व उत्कृष्ट जिल्हा जिल्हास्तरीय महाविद्यालय द्वितीय, तसेच उत्कृष्ट करिअर संसद व करिअर कट्टा उपक्रम अंतर्गत रील्स स्पर्धा तृतीय पारितोषिक असे एकूण चार पारितोषिके मिळाली आहेत.
या पारितोषिक व पुरस्कारा बदल संस्थेचे चेअरमन मा. दादासाहेब संजयरावजी गरुड, संस्थेचे उपाध्यक्ष भीमराव शामराव शेळके,सचिव काकासाहेब सागरमल जैन, सहसचिव दादासाहेब यु.यु पाटील, कार्यालयीन सचिव भाऊसाहेब दीपकजी गरुड व सर्व संस्था परिवार यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments