लोहारा ता. पाचोरा दि.२
येथील तरुण शेतकरी संदीप विक्रम चौधरी वय ४५
यांनी आज सकाळी ८ वाजेला शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असुन आत्महत्येचे कारण अजून अस्पष्ट आहे. सदर घटनेचा लोहारा पोलीस स्टेशन यांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाचोरा रुग्णालयात केले आहे.
त्यांच्यावर आज संध्याकाळी ठीक 7 वाजेच्या दरम्यान लोहारा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
त्यांची अंत्ययात्रा शिंदे गली (जुनी) येथून निघणार आहे.
त्यांच्या पश्चात आई-वडील भाऊ बहीण पत्नी दोन मुले असा परिवार आहे.
येथील सामाजिक कार्यकर्ते श्री विक्रम विठ्ठल चौधरी तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य जनाबाई विक्रम चौधरी यांचे चिरंजीव होते.
त्यांच्या जाण्याने चौधरी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Post a Comment
0 Comments