पहुर प्रतिनिधी- ,ता .जामनेर
दिशा लाईव्ह न्यूज--::----जळगाव छत्रपती संभाजी नगर राष्ट्रीय महामार्गावर आज सायंकाळी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयास्पद वाहनातून स्थानिक गुन्हे शाखा आणि पहूर पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत लाखोंचा गांजा जप्त करण्यात आला असून दोन वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत . ३ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते .
फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने नमुने तपासणीसाठी घेतले आहेत .पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे , पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे .



Post a Comment
0 Comments