दिशा लाईव्ह न्यूज---:::----आपल्या धडाकेबाज कामगिरीने तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील असंख्य मित्र परिवार यांचा गोतावळा निर्माण करणारे स्नेहसंबंध दृढ करण्यासाठी सतत प्रयत्न करत पोलिस व नागरिक यांच्या मध्ये आपुलकीची,आस्थेची व आपलेपणाची जाणीव करून देत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्नशील असणारे,प्रेमळ, सहजपणे कुणालाही उपलब्ध असणारे,बोलणारे पण कायदा व शांततेला जर कुणी गालबोट लागले तर कर्तव्यकठोर असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे नंदकुमार शिंब्रे साहेब होय.
विदर्भ जन्मभुमी गडचिरोली सारख्या दुर्गम तेवढ्याच सतत संघर्ष असणाऱ्या ठिकाणी सुद्धा धाडस जिद्द चिकाटी व पोलीस अधिकारी म्हणुन सेवा पुढे मराठवाड्यात सेवा आणि आता खान्देशात शेंदुर्णी येथे कार्यरत आहे..
गेल्या अनेक वर्षापासुन शेंदुर्णी दुर क्षेत्र आहे तिथं दोन पत्र्याच्या खोल्यांमध्ये सुरू होते.पोलिस अधिकारी कर्मचारी व नागरिक यांना सुद्धा खुप त्रास सहन करावा लागत होता.पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार शिंब्रे यांनी मात्र ही परिस्थिती बदलण्यासाठी चंग बांधला आणि मग शहरातील काही दाते, संस्था व पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या प्रयत्नामुळे सहकार्य यातुन मग या दुर क्षेत्र चे रुपडं पालटले.२४ तास नागरिकांच्या मदतीला तत्पर असणारे,
शेंदुर्णी शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्नशील असणारे मैत्रिच्या दुनियेतील राजा माणुस मित्र असणारे आदरणीय पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार शिंब्रे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


Post a Comment
0 Comments