पहूर प्रतिनिधी--ता जामनेर
दिशा लाईव्ह न्यूज--::---फळ आणि फुलांच्या राज्यस्तरीय महोत्सवात पहूर (हिवरी) . ता. जामनेर येथील केळीने राज्यात पहिला येण्याचा मान पटकाविला आहे.
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे सेवर निसर्गोत्सव प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. याअनुषंगाने मिलांज फळांचा महाराजा या राज्यस्तरीय स्पर्धाही घेण्यात आली.
या स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या आठशेहून अधिक फळांचे नमुने स्पर्धेसाठी मांडण्यात आले होते. त्यात केळी गटात पहूर (हिवरी). ता. जामनेर येथील केळी सर्वोत्कृष्ट ठरली असून राज्यात पहिला येण्याचा मान मिळविला आहे.
पहूर (हिवरी)येथील प्रगतशील शेतकरी राहुल प्रल्हाद पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून आपली वडिलोपार्जित शेती कसत आहेत. बदलत्या काळानुसार पीक पद्धतीत आणि बदल करून त्यांनी आधुनिक शेतीची कास धरली. गेल्या 15 वर्षांपासून सातत्याने केळी या फळ पिकाची लागवड करून भरघोस उत्पादन घेत आहेत. अत्यंत शास्त्रशुद्ध आणि आधुनिक पद्धतीचा वापर करीत त्यांनी कृषी क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोग ते आपल्या शेतीत करीत असतात.
केळी पिकाबरोबरच इतर पिकांचीही शेती ते उत्तम पद्धतीने करीत असतात. अनेक वर्षांच्या शेतीचा अनुभव असल्याने त्यांच्याकडून परिसरातील तसेच विविध भागांतील शेतकरी मार्गदर्शन घेते असतात. दरम्यान अनेक शेतकरी दरवर्षी प्रत्यक्ष पीक पहाणीसाठी येऊन त्यांच्या शेतावर भेट देत असतात.
आपल्या शेतात विश्वास राहुल पाटील यांनी सुमारे ६ ते ७ एकरमध्ये एकूण १० हजार केळींच्या झाडांची लागवड केली आहे. अतिवृष्टी, रोगराई, नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत त्यांनी आपल्या केळी पिकाची निगा राखत उत्तम स्थितीत ठेवले आहे.
नुकत्याच पिंपळगाव बसवंत नाशिक येथे पूर्वा केमटेक प्रा. लि. नाशिक आयोजित मिलांज फळांचा महाराजा या स्पर्धेत राहुल पाटील यांच्या केळी पिकाला पहिला पुरस्कार मिळाला आहे. व दुसरा क्रमांक जगदीश पाटील सहभागी म्हणून निलेश पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी कृषी पंडित चे संचालक प्रदीप भाऊ लोढा , मा.जी.प. सदस्य कैलास दादा पाटील, स्वरछाया कृषी केंद्र, पहूर चे संचालक नितीन पाटील, दिपक लोढा,पूर्वा केमटेक.प्रा, ली. नाशिक ,एरिया सेल्स मेनेजर सचिन कापडणीस सर, किरण राजपूत सर ,महेंद्र जाधव यांच्या हस्ते मिलांज फळांचा महाराजा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल राहुल पाटील यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.



.jpg)
Post a Comment
0 Comments