सुनील लोहार
दिशा लाईव्ह न्यूज--::----कुऱ्हाड ता.पाचोरा=दिव्यांग मंत्रालयाच्या आदेशानुसार बोगस दिव्यांग शोध मोहिमेसाठी आवश्यक असलेले यु डी आय डी कार्ड तपासणीसाठी दिलेली मुदत वाढवण्यासाठी प्रहार संघटनेतर्फे दिनांक 17 रोजी सकाळी पाचोरा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार विनोद कुमावत यांना निवेदन देण्यात आले.
बोगस दिव्यांग शोध मोहिमेअंतर्गत तपासणीसाठी यु डी आय डी कार्ड व इतर प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सुमारे सहा ते सात महिने वेळ लागणार असल्याने याकरिता शासनातर्फे 31 मार्च ची मुदत देण्यात आलेली होती,
कारण बऱ्याचशा दिव्यांग बांधवांच्या वैद्यकीय तपासणीनंतर देखील यु डी आय डी कार्ड मिळण्यासाठी उशीर लागणार असल्याने तसेच या साठी जिल्हास्तरीय तांत्रिक अडचण येत असल्याने कागदपत्रांची छाननी करण्यासाठी शासनातर्फे 31 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ मिळण्यासाठी तहसीलदार पाचोरा यांना कुऱ्हाड येथील प्रहार संघटनेचे आकाश चित्ते, दिव्यांग संघटनेचे उमेश पाटील ,एजाज कहाकर ,अण्णा पाटील आदींनी निवेदन दिले.

Post a Comment
0 Comments