Type Here to Get Search Results !

पहूर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ अभियान उत्साहात संपन्न




पहूर प्रतिनिधी-- ता. जामनेर :

 दिशा लाईव्ह न्यूज--::---अहिल्यादेवी होळकर मंगल कार्यालय, पहूर पेठ (ता. जामनेर) येथे दि. ०७ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ अभियान उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे होते.


अध्यक्षीय मनोगतात तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. महसूल विभागाच्या विविध योजनांची माहिती देताना त्यांनी जिवंत ७/१२ मोहीम, राजपत्राद्वारे नाव बदल, कु.का. कलम ४३ ची अट कमी करणे, भोगवटादार वर्ग-२ मधील जमीन वर्ग-१ मध्ये रूपांतर, शेतरस्ते योजना, ‘मागेल त्याला शेततळे’ योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना, पीएम किसान योजना, विविध कृषी योजना, लाडकी बहीण योजना आदी योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन केले.



कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत सादर केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.


या शिबिरात संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच जिवंत ७/१२ मोहीम अंतर्गत वारस दाखले, ७/१२ उतारे आणि जागा वाटपाचे उतारे नागरिकांना वितरित करण्यात आले. महा-ई-सेवा केंद्रामार्फत जात प्रमाणपत्र, अधिवास, राष्ट्रीयत्व, नॉन-क्रीमीलेयर, केंद्रीय जात प्रमाणपत्र तसेच उत्पन्न दाखले आदी विविध प्रमाणपत्रांचेही वितरण करण्यात आले.


यावेळी भूमी अभिलेख कार्यालय जामनेरच्या अधीक्षक लेकुरवाळे मॅडम, महसूल नायब तहसीलदार सतीश इंगळे, माया शिवदे, सुभाष कुंभार, पुरवठा निरीक्षक नारायण सुर्वे, तसेच अब्बू तडवी, शंकर जाधव, राजू जाधव, प्रदीप लोढा, राजधर पांढरे, बाबुराव घोंगडे, ईश्वर बारी, विष्णू तायडे, प्रविण गांगुर्डे, कृष्णा पाटील, ललित लोढा, श्याम सावळे, रामेश्वर पाटील, शेख चांद जलालुद्दीन आदी मान्यवर उपस्थित होते.


तसेच योगेश पालवे (ग्रामसेवक, पहूर पेठ), रमेश वंजारी (मंडळ अधिकारी, पहूर), पल्लवी साळुंखे, पूजा नागरे, पूजा सोनवणे, किर्ती निघोट, दिपाली बावणे (सर्व ग्राम महसूल अधिकारी), अमोल सटाले (महसूल सेवक), विजय सूर्यवंशी, गोकुळ पाटील, सय्यद नदीम, शकील तडवी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावित्रीबाई फुले विद्यालयाचे शिक्षक शंकर भामेरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मंडळ अधिकारी रमेश वंजारी यांनी केले.

Post a Comment

0 Comments