नानाभाऊ राजपूत-लोहारा.
दिशा लाईव्ह न्यूज---:::---लोहारा तालुका पाचोरा- दि ७ बाजारपेठेजवळील गावदरवाजा कमान ऐतिहासिकतेचा ठेवा होती शेकडो वर्षांची असल्याने अतिशय जीर्ण अवस्था तिची झाली असताना याच ठिकाणी पोळा सण अतिशय उत्साहाने साजरा व्हायचा आणि त्यात अनेकांचे दैनंदिन येणे-जाणे व्हायचे ही गावदरवाजा कमान अतिशय जीर्ण झाल्याने धोकादायक स्थितीने ती नव्याने बांधण्याची मागणी होत होती.
तत्कालीन स्व.सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत प्रशासनाने इंत्यभूत बाबींचा विचार करून अतिशय मोठ्या गाव दरवाजा कमानीचे बांधकाम केले. अशातच विद्यमान सरपंच अक्षय कुमार जैस्वाल यांचे दि. ३० जानेवारी रोजी अकाली निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचा मुलगा मयूर अक्षयकुमार जैस्वाल याने ७ मार्च शनिवार रोजी हनुमान मंदिरात विधिवत पूजा करून दक्षिणमुखी हनुमान मूर्तीची गाव दरवाजा कमानीवर स्थापना केली.
अतिशय मजबूत आणि सुंदर अशी कमान (दरवाजा) तयार झाल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.मात्र स्व.मा.सरपंच अक्षय कुमार जयस्वाल यांच्या आठवणीने मात्र प्रत्येकाच्या मनात काहूर माजले होते.
स्व.अक्षय भाऊ जैस्वाल यांच्या मुलाने मयुर जैस्वाल यांनी
केली लोहारे गावाच्या प्रवेशद्वारावर पवन पुत्र श्री हनुमान मूर्तीची स्थापना करून मुलाने आपले दातृत्व दाखवून दिले आहे.अक्षय भाऊ यांचा समाजसेवेचा वारसा कायम ठेवला आहे.
यावेळी युवा उद्योजक मयुरभाऊ यांचे लोहारा गावाच्या वतीने आभार देखील मानण्यात आले आहे.
यावेळी माजी सरपंच अमृत चौधरी, सदस्य ईश्वर देशमुख ,डॉ. बाळू जैन, भाजपचे जेष्ठ नेते शरद सोनार , सामाजिक कार्यकर्ते सागर भोई,सामाजिक कार्यकर्ते व ॲ. हेमंत गुरव, सुरेश मोरे , सुधीर चौधरी,अशोकभाऊ बोरसे, राहुल कटारिया, मनोज सोनार ,अर्जुन पाटील, सुभाष जाधव, अशोक क्षीरसागर, विजय चौधरी ,शांताराम चौधरी, कुलवंत शेळके,संतोष कोळी ,नाना चौधरी, आबा चौधरी, विजय चौधरी, अतुल बरकले, योगेश कोळी, रमेश कोळी, गजानन सरोदे, दिनकर गीते, डॉ.प्रवीण भोसांडे, अशोक क्षीरसागर, सुनील क्षीरसागर डॉ. प्रीतीश चौधरी, पत्रकार चंद्रकांत पाटील, नाना राजपूत, गोपाल पांढरे, ईश्वर खरे ,निलेश जोशी, विजय महादव चौधरी, भारत पाटील ,सतीश शेळके, कैलास क्षीरसागर ,योगेश कोळी, पंकज डांबरे ,राहुल गोंधळे ,आदी ग्रामस्थ हजर होते.

.jpg)






Post a Comment
0 Comments