सोयगाव प्रतिनिधी – दत्तात्रय काटोले
दिशा लाईव्ह न्यूज--::---सोयगाव येथे पंचक्रोशीत भव्य “हिंदू संमेलन” आयोजित करण्यात आले असून येत्या मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ८ या वेळेत हा कार्यक्रम पार पडणार आहे. शेंदुर्णी बायपास रोडवरील अनंत शेठ जगताप यांच्या प्लॉटमध्ये या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
संपूर्ण पृथ्वी हे एक कुटुंब आहे, या विचारातून पर्यावरणाचा समतोल राखणे तसेच समाजामध्ये वाढत चाललेला द्वेष, हिंसा व तणाव दूर करून एकात्मतेचा संदेश देणे, हा या संमेलनामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येत राष्ट्रप्रेमाची भावना दृढ करावी आणि भारताला विश्वगुरू बनविण्याचा संकल्प करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
या संमेलनाला विविध धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. श्री गोपाल चैतन्यजी बाबाजी, श्री आशुतोषजी, श्री ब्रह्मानंद महाराज यांचे आशीर्वाद लाभणार असून हिंदुत्ववादी विचारांचे प्रमुख वक्ते म्हणून श्री गोरक्षनाथ आबुज मार्गदर्शन करणार आहेत.
“सकल हिंदू समाज” यांच्या वतीने आयोजित या संमेलनासाठी सर्व हिंदू बांधव, भगिनी तसेच युवकांनी सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हिंदू धर्माचा सकारात्मक संदेश
हिंदू धर्म हा केवळ एक धर्म नसून तो जीवन जगण्याची एक महान पद्धत आहे. “वसुधैव कुटुंबकम्” हा संदेश देणारा हिंदू धर्म संपूर्ण मानवजातीला एकत्र आणण्याचा विचार मांडतो. सत्य, अहिंसा, सहिष्णुता, प्रेम आणि निसर्गाशी सुसंवाद हे हिंदू धर्माचे मूलभूत तत्त्व आहेत.
आजच्या काळात समाजात वाढत असलेला तणाव, द्वेष आणि असहिष्णुता दूर करण्यासाठी हिंदू धर्माचा समतोल, संयम आणि एकतेचा मार्ग अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगताना इतरांच्या श्रद्धेचाही आदर करणे, हीच खरी हिंदू संस्कृती आहे.
“सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः” या विचारातून प्रत्येकाच्या कल्याणाची भावना जोपासणे, हाच खरा धर्म आहे. चला, एकत्र येऊया, संस्कार जपूया आणि प्रेम, शांतता व बंधुभावाने समाज अधिक मजबूत बनवूया.
सोयगाव येथील हिंदू समाज बांधव यांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन केले. कृषी भूषण अरुण सोहनी सोयगाव.

.jpg)
Post a Comment
0 Comments