दिशा लाईव्ह न्यूज -:- द युवा ग्रामीण पत्रकार संघातर्फे राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या पुरस्कारांमुळे समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान तर होतोच, पण इतरांसाठीही प्रेरणादायी उदाहरण निर्माण होते.
या वर्षीही राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा पंढरपूर येथे 31 मार्च 2026 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमास विविध मान्यवर, अधिकारी तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना मानचिन्ह, सन्मानपत्र आणि फेटा देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
जळगांव जिल्ह्यातील राज्यस्तरीय पुरस्कारथी.
दिनेश चौधरी, लोहारा-उत्कृष्ट पदाधिकारी.(जळगांव जिल्हाध्यक्ष)
चैतन्य कैलास कासार,शेंदूर्णी, ता.जामनेर.
आदर्श डॉक्टर पुरस्कार.
प्रदीप आकाश सोनार,
वरखेडी,ता.पाचोरा.
उत्कृष्ट चित्रकला शिक्षक
आर. एस. परदेशीसर,
वाडे-गुढे, ता.भडगाव.
आदर्श शिक्षक पुरस्कार.
विलास भाऊराव पाटील,पिंपळगाव, ता.जामनेर.
आदर्श शेतकरी पुरस्कार.
मंगलदास किसन मोरे,लोहारा, ता.पाचोरा.
उत्कृष्ट कवी / लेखक पुरस्कार
प्रा. राहुल निकम (पाटील)
कासमपुरा,गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार.
दिव्या विजय पाटील-म्हसास,ता.पाचोरा
अश्वमेध महाराष्ट्र भूषण पुरस्कार.(क्रीडाक्षेत्र)
हरी नारायण महाजन-
साहित्यरत्न पुरस्कार--मेणगाव, ता.जामनेर.
पुंडलिक सोनजी चौधरी-
आदर्श शिक्षक पुरस्कार-ह.मु.जामनेर
डॉ. दिलीपकुमार ललवाणी,भुसावळ.
समाजभूषण पुरस्कार
सौ.जयश्री ओमप्रकाश वर्मा वाघ,पाचोरा.
महाराष्ट्र रत्न पुरस्कार.
निलेश दिलीप जोशी,लोहारा, ता.पाचोरा
श्रेष्ठ पुरोहित गौरव सन्मान पुरस्कार.
श्री बालू मोहन जोशी,वाकडी,ता.जामनेर
आदर्श शिक्षक.
रवींद्र सुभद्राबाई पितांबर महाजन,एरंडोल
महात्मा जोतिबा फुले पुरस्कार.
डॉ.श्रीकांत उल्हास चौधरी
जीवन भूषण--फैजपूर
ज्ञानेश्वर दौलत माळी
कृषीभूषण पुरस्कार,लोहारा, ता.पाचोरा
आदित्य सुर्यकांत सावळे,
जलभूषण पुरस्कार,जळगांव
अजय अशोक चौधरी,
तेली समाजभूषण पुरस्कार-जामनेर
ईश्वर आनंदा देशमुख,
समाजभूषण पुरस्कार-लोहारा, ता.पाचोरा
पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी आपल्या कार्यातून समाजाच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कष्ट, जिद्द आणि समर्पणामुळे त्यांना हा मानाचा सन्मान मिळाला आहे. त्यांच्या या यशामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये तसेच गाव, तालुका आणि जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यस्तरीय पुरस्कार हा केवळ सन्मान नसून समाजासाठी केलेल्या कार्याची पावती आहे. अशा पुरस्कारांमुळे इतरांनाही समाजोपयोगी कार्य करण्याची प्रेरणा मिळते. भविष्यातही पुरस्कारप्राप्त व्यक्ती समाजासाठी अधिक जोमाने कार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या कार्यक्रमाला जळगाव जिल्हाध्यक्ष दिनेश चौधरी, संघटनेचे पदाधिकारी शंकर भामेरे, ईश्वर हिवाळे,दिलीप राजपूत, चंद्रकांत पाटील,बाळू जोशी, या सह सर्व पुरस्कार्थी मान्यवर हजर होते.
या यशाबद्दल संघटनेचे राष्ट्रीय व संस्थापक अध्यक्ष शेख अन्सार,राज्य अध्यक्ष शेख शकील मणियार,
कल्पना पवार मॅडम राष्ट्रीय महिला अध्यक्ष. सचिव बाळासाहेब कोठुळे ,जळगांव जिल्हाध्यक्ष दिनेश चौधरी या सह सर्व पदाधिकारी व सर्व स्तरातून पुरस्कारप्राप्त व्यक्तींचे अभिनंदन करण्यात येत आहे .आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द युवा ग्रामीण पत्रकार संघटना पुणे जिल्हा महिला जिल्हा उपाध्य ऐश्वर्य चासकर प्रसिद्ध निवेदिका यांनी केले.






.jpg)








Post a Comment
0 Comments