दिशा लाईव्ह न्यूज-:--लोहारा ता पाचोरा धी.शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को–ऑपरेटिव्ह सोसायटी द्वारा संचलित डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा तालुका पाचोरा येथील कला शिक्षक श्री.प्रदिप आकाश सोनार यांच्या शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्या साठी द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन पंढरपूर या तीर्थस्थळी गौरविण्यात आले.
हा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात लोहारा विद्यालयाचे आदर्श व प्रतिभावंत कला शिक्षक श्री प्रदीप आकाश सोनार सर यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
त्यामुळे शेंदुर्णी शिक्षण संस्थेच्या लोहारा विद्यालयाच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला गेला असून संपूर्ण लोहारा परिसरात पाचोरा तालुक्यातील प्रदिप सोनार सर यांच्यावर अभिनंदनचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सोनार सर यांनी आपल्या कार्यातून समाजाच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कष्ट, जिद्द आणि समर्पणामुळे त्यांना हा मानाचा सन्मान मिळाला आहे. त्यांच्या या यशामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये तसेच गाव, तालुका आणि जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुरस्कारार्थींवर अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
राज्यस्तरीय पुरस्कार हा केवळ सन्मान नसून समाजासाठी केलेल्या कार्याची पावती आहे. अशा पुरस्कारांमुळे इतरांनाही समाजोपयोगी कार्य करण्याची प्रेरणा मिळते. भविष्यातही पुरस्कारप्राप्त व्यक्ती समाजासाठी अधिक जोमाने कार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या यशाबद्दल सर्व स्तरातून पुरस्कारप्राप्त व्यक्तींचे अभिनंदन करण्यात येत आहे .तसेच त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
कार्यक्रमात ह.भ.प. सावता महाराज वसेकर (१९ वे वशंज श्री संत शिरोमणी सावता महाराज),
डॉ. प्रणिती भालके (नगराध्यक्ष : पंढरपूर शहर),
दशरथ वाघमोडे (पोलिस निरीक्षक, पंढरपूर पो. ठाणे),
ॲड. माधवी निगडे (पंढरपूर देवस्थान विश्वस्त),
अन्सार शेख (संस्थापक/अध्यक्ष द युवा ग्रामिण पत्रकार संघ), अनिता शिंदे (वनरक्षक अधिकारी),
अशोक ढाकणे (उद्योजक प्रथमेश मसाले),
ॲड. प्रणव परिचारक (भाजपा जिल्हा उपाध्यक्ष),
कल्पना पवार, (राष्ट्रीय महिला अध्यक्ष: युरवा ग्रामीण पत्रकार संघटना),
ह.भ.प. नामदेव महाराज साठे (अध्यक्ष: श्री संतराज महाराज पवार ट्रस्ट)
यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सह जळगाव जिल्ह्यातील
विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना मानचिन्ह, सन्मानपत्र आणि शाल देऊन गौरविण्यात आले.
यावेळी संघटनेचे राष्ट्रीय व संस्थापक अध्यक्ष शेख अन्सार,राज्य अध्यक्ष शेख. शकील मणियार, सचिव बाळासाहेब कोठुळे ,जळगांव जिल्हाध्यक्ष दिनेश चौधरी, जळगांव जिल्हा संपर्कप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या सह प्रमुख अतिथी व सर्व संघटनेचे पदाधिकारी शंकर भामेरे, ईश्वर हिवाळे, दिलीप राजपूत, बाळू जोशी, या सह सर्व जिल्ह्यातील पुरस्कार्थी मान्यवर इत्यादी हजर होते.
कार्यक्रमासाठी द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य, शे शकील मणियार राज्य अध्यक्ष,
रुपाली सावंत महिला राज्य अध्यक्षा,
बाळासाहेब कोठुळे राज्य सचिव,
डॉ.मंगल सासवडे महिला राज्य सचिव,
संतोष लांडे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष,
दिनेश शिंदे सोलापूर जिल्हाध्यक्ष
धनश्री कदम सोलापूर महिला जिल्हाध्यक्षा,
प्रतिक नलावडे जिल्हा उपाध्यक्ष यांनी परिश्रम घेतले.
प्रास्ताविक बाळासाहेब कोठुळे, सूत्रसंचालन व आभार ऐश्वर्या चासकर यांनी मानले.

.jpg)
Post a Comment
0 Comments