सुनील लोहार .
दिशा लाईव्ह न्यूज--::--- लोहारा येथून जवळच असलेल्या कुऱ्हाड ,ता.पाचोरा येथील तेजस्वीनी कैलास चौधरी या मुलीने मुंबई लोहमार्ग पोलीस भरती मध्ये बाजी मारून आई वडिलांचे,गावाचे स्वप्न पूर्ण केले.दररोज मैदानी चाचणी व लेखी परीक्षेचा सातत्याने अभ्यास करून तिने यश मिळवले. आई वडील शेती करून मुलांना लहानचे मोठे करून त्यांचे ध्येय व स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी तेजस्विनी ला प्रोत्साहन दिले.
तिने देखील इतर गोष्टीकडे लक्ष न देता करिअर कडे लक्ष दिले.
म्हणजेच अंगाला हळद लावण्याचे स्वप्न न बघता अंगावर गुलाल उधळीत पोलीस भरतीत बाजी मारली.
मुंबई लोहमार्ग पोलीस मध्ये भरती होऊन तेली चौधरी समाजात पहिलीच व गावात दुसरी महिला पोलीस होण्याचा मान तिने मिळवला. अभ्यासात कायम सातत्य,मेहनत व चिकाटीच्या सहाय्याने आपल्याला सहज यश मिळविता येते असे देखील तेजस्विनी सांगितले
तेंजस्विनी ने 12वी शेंदुर्णी ललवाणी कॉलेज येथे व
BSC , पर्यंतचे..संत ज्ञानेश्वर विद्यालय सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथे घेतल्यानंतर तिने खाकी वर्दी साठी अहोरात्र मेहनत करीत वर्दी मिळवली. मुबंई लोहमार्ग पोलीस दलात पोलीस पदी तिची निवड झाल्याबद्दल समस्थ गावकरी, आई, वडील, नातेवाईक यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रतिक्रिया-:-दिनेश चौधरी, लोहारा
संपादक-दिशा लाईव्ह न्यूज. 9309918930
तेजस्विनी ही तेली समाजासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी कामगिरी एका कष्टाळू मुलीने करून दाखवली आहे. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर तिने पोलीस दलात भरती होऊन आपल्या कुटुंबासह संपूर्ण समाजाचे नाव उज्ज्वल केले आहे.
सामान्य कुटुंबातून आलेल्या या मुलीने अनेक अडचणींवर मात करत आपले शिक्षण पूर्ण केले आणि पोलीस भरतीसाठी कठोर परिश्रम घेतले. शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि इतर टप्पे यशस्वीरीत्या पार करत तिने अखेर पोलीस दलात स्थान मिळवले.
तिच्या या यशामुळे तेली समाजातील तरुण-तरुणींना प्रेरणा मिळाली असून “मेहनत आणि आत्मविश्वास असेल तर कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते” हे तिने सिद्ध करून दाखवले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत असून कुटुंबीय, नातेवाईक व समाजबांधवांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.


Post a Comment
0 Comments