Type Here to Get Search Results !

मरीमाता महालक्ष्मीच्या मंदिर विकासासाठी मदत करणार! उद्योजक सत्यवानदादा बाळसराफ


काशिनाथ आल्हाट-:- जुन्नर तालुका प्रतिनिधी 

दिशा लाईव्ह न्यूज :--   सालाबाद वर्षाप्रमाणे सावरगाव तालुका जुन्नर येथील समस्त आल्हाट परिवाराच्यावतीने 

 मरीमाता महालक्ष्मी यात्रेचे नियोजन भव्य  प्रमाणात करण्यात आले होते.अशी माहिती लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे  महाराष्ट्र शासन समाजभूषण पुरस्कार्थी   तथा आद्यगुरु लहुजी साळवे महाराष्ट्र शासन स्मारक समिती सदस्य काशिनाथ आल्हाट यांनी दिली.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा परिषद सदस्य  गुलाबशेठ  पारखे,  सावरगावचे आदर्श सरपंच  पै.दिपक बाळसराफ,मातोश्री उद्योग समूहाचे  उद्योजक सत्यवान बाळसराफ,शिवसेना नेते रोहिदास गोरडे, पिंपरी चिंचवडचे सेवानिवृत्त  आदर्श केंद्रप्रमुख दादाभाऊ आल्हाट ,हलगी सम्राट एकनाथ आल्हाट , हलगी सम्राट सखाराम  आल्हाट आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


जि. प. सदस्य गुलाब शेठ पारखे म्हणाले, "या देवीच्या मंदिराकडे येणा-या रस्त्यासाठी समन्वय साधून रस्त्याचे काम केले जाईल.

 

  उद्योजक सत्यवानशेठ बाळसराफ म्हणाले, मंदिराच्या विकासासाठी मदत केली जाईल. सावरगाव येथील 

मरीमाता  मंदिर, खंडेराया मंदिर आणि जानूबाई या मंदिराचा परिसर म्हणजे आमचे बालपण येथे गेले. "मंदिर परिसरातील या मातीचा स्पर्श  माझ्या कपाळाला आहे. आजचे चांगले. देवीच्या  आशीर्वादाने आहेत.

या यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी आल्यानंतर भूतकाळातील अनेक आनंदाच्या गोष्टींची आठवणी आल्या.

त्यामुळे या मंदिराच्या विकासासाठी निश्चित मदत केली जाईल. आदर्श सरपंच पै.दिपक बाळसराफ म्हणाले "या देवीच्या विकासासाठी  निधी कमी पडू देणार नाही"!

बस्ती सावरगाव येथील आल्हाट परिवार हा उदरनिर्वाच्या निमित्ताने मुंबई, पुणे, तळेगाव या ठिकाणी वास्तव्याला मोठ्या प्रमाणात आहे. वर्षातून एक दिवस महालक्ष्मी मरीमाता यात्रेच्या निमित्ताने सर्वांना गावाला येण्यासाठी ही सुवर्णसंधी असते.


 पूर्वी या देवीच्या यात्रेचे स्वरूप अतिशय कमी प्रमाणात होते.  परंतु अलीकडच्या काळात परिवार एकत्र येऊन सामाजिक विचार, वैचारिक विचारांच्या निमित्ताने समन्वय साधून मोठ्या प्रमाणात यात्रेचे नियोजन केले जाते.

 आल्हाट परिवाराचे महालक्ष्मी मरीमाता हे ग्रामदैवत मीना नदीच्या दक्षिण मुखावर  वसलेले असल्याने, ते जागृत देवस्थान आहे. अशी  भावना आहे.

चैत्र महिन्यात  उन्हाळा सुरू होतो. झाडांना नवी पालवी फुटते ,याच महिन्यात होळीचा सन असतो.  या महिन्यात  देवीची यात्रा म्हणजे एकमेकांच्या मनातील द्वेष ,राग ,लोभ  सोडून परिवर्तनाची ही यात्रा ठरली जाते. 

या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबई रहिवासी सामाजिक कार्यकर्ते किशोर आल्हाट यांनी नवीन पिढीच्या तरुणांना सामाजिक भान यावरती विचार मांडले. "जेव्हा विचारांची देवाणघेवाण होते', तेव्हां ती व्यक्ती आपली वाटते. 

"व्यक्ती एकत्र आल्या की, समाज एकत्र येतो 

  आणि समाजाला दिशा  मिळते".

 

यात्रा कमिटीचे अध्यक्ष अजय आल्हाट यांनी सर्वांचे आभार मानले.

अमित आल्हाट ,  विशाल आल्हाट ,संदिप आल्हाट, नरेंद्र आल्हाट,बिना आल्हाट  ,संतोष आल्हाट, सचिन आल्हाट,  सत्यम आल्हाट,गणेश आल्हाट यांनी विशेष परिश्रम घेतले.

नरेंद्र मुरलीधर  आल्हाट सर यांनी मंदिरासाठी लाईट फिटिंगचे योगदान दिले . तर गणेश आल्हाट , सचिन आल्हाट, प्रकाश आल्हाट मुंबई या बंधूंनी महाप्रसादाचा खर्च केला.

गुणवंत कलावंत सनई सम्राट बबन आल्हाट  यांच्या पारंपरिक वाद्यवंदाने मिरवणुकीची रंगत  आणली.

Post a Comment

0 Comments