भारतीय चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू पार्श्वगायिका आशा भोसले (९२) यांचे आज १२ एप्रिल २०२६ रोजी मुंबईत निधन झाले आहे.
दिशा लाईव्ह न्यूज-:--भारताची गाणकोकीळा स्व.लता मंगेशकर यांचे काही वर्षांपूर्वी दुःखद निधन झाले.सिनेरसिक त्या दुःखातून सावरत नाही तोच त्यांच्या लहान बहीण व सुप्रसिद्ध गायिका आशा ताई भोसले यांचे आज उपचार सुरू असतांना दुःखद निधन झाले आहे.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या चिरतरुण आवाजाने सगळ्या जगाला भुरळ घालणाऱ्या आशा भोसले या आज काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. आशा भोसले यांच्या छातीत संसर्ग झाल्याने त्यांना शनिवारी रात्री उशिरा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी आशा भोसले यांच्या निधनाची माहिती दिली. उद्या दुपारी ४ वाजता आशा भोसले यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टी, गायन क्षेत्र आणि कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
आशा भोसले यांचे व्यक्तिमत्त्व आणि कारकीर्द:
- जन्म आणि बालपण: ८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगलीत प्रसिद्ध शास्त्रीय गायक दीनानाथ मंगेशकर यांच्या घरी जन्म [४].
- सुरुवात: वयाच्या १० व्या वर्षी वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाच्या आर्थिक मदतीसाठी गायनाला सुरुवात केली [३, ४].
- प्रसिद्ध गाणी: 'पिया तू अब तो आजा', 'दम मारो दम', 'चुरा लिया है तुमने', 'इन आंखों की मस्ती' यांसारखी रोमँटिक, गझल, आणि आयटम साँग्स लोकप्रिय आहेत [३, ७].
- पुरस्कार: पद्मभूषण, पद्मविभूषण, अनेक फिल्मफेअर आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित [३, १४].
- विशेष ओळख: आर. डी. बर्मन यांच्यासोबतची त्यांची जोडी गाजली. त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील 'सुरसम्राज्ञी' मानले जाते [३, ९].


Post a Comment
0 Comments