Type Here to Get Search Results !

वीज तारांच्या ठिणगीमुळे शेताला लागली आग.. ज्वारी पिकासह सोलर पंप जळून खाक. कुऱ्हाड येथील शेतकऱ्याचे सुमारे पन्नास हजाराचे आर्थिक नुकसान



कुऱ्हाड  प्रतिनिधी -:-सुनील लोहार 

दिशा लाईव्ह न्यूज --::---शेतातून गेलेल्या विजतारांच्या ठिणगी ने संपूर्ण शेतात   आग लागून शेतकऱ्याचे  सुमारे 40 ते 50 हजाराचे आर्थिक नुकसान झाले.ही घटना आज दुपारी घडली.

लोहारा येथून जवळच असलेल्या कुऱ्हाड खुर्द येथील शेतकरी रघुनाथ रामा सुतार  यांची वडगाव आंबे शिवारात  385 गट क्रमांकाची शेती आहे.आज बुधवारी दुपारी बारा वाजता या ठिकाणी असलेल्या विजेच्या तारांमुळे ठिणगी पडून संपूर्ण शेताने पेट घेतला.शेतात कापून ठेवलेली अंदाजे 7 ते 8 किंटल ज्वारी तसेच पाच हजार रुपये किमतीचा चारा जळून खाक झाला.



 विहिरीवर असलेली सोलर प्रणाली थोडक्यात बचावली.

सबंधित शेतकऱ्याने विहिरीवर सोलर प्रणाली बसवलेली होती.परंतु सोलर टेकड्यावर बसविलेले असल्याने ते थोडक्यात बचावले.परंतु सोलारचे पाईप ,विहिरीतील पाईप व वायर आदी जवळपास दहा हजार रुपयाचे साहित्य जळून खाक झाले.एकंदरीत शेतकऱ्याचे 40 ते 50 हजाराचे आर्थिक नुकसान झाले असून.महावितरण वीज कंपनी कुऱ्हाड तर्फे घटनेचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी या शेतकऱ्याने केली आहे.

Post a Comment

0 Comments