Type Here to Get Search Results !

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती जामनेर तालुक्यात उत्साहात साजरी भव्य मिरवणूक घरोघरी बाबासाहेबांना अभिवादन; सर्व समाजाचा उत्स्फूर्त सहभाग.


फत्तेपूर-तोरणाळे प्रतिनिधी-- कृष्णा पाटील

दिशा लाईव्ह न्यूज--::---जामनेर-तालुक्यातील तोरणाळे, जुनोना, देऊळगाव आणि परिसरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

यावेळी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि सामाजिक समतेचे प्रणेते बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करण्यात आला. मिरवणुकीत घोषणाबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि आकर्षक सजावटीमुळे वातावरण भारावून गेले होते.

गावातील सर्व समाजबांधवांनी कोणताही भेदभाव न ठेवता एकत्र येत जयंती उत्सव साजरा केला. अनेक ठिकाणी बाबासाहेबांच्या प्रतिमेला घरोघरी पूजा करून पुष्पगुच्छ अर्पण करण्यात आले.

या सोहळ्यात तरुण मित्रमंडळी, सर्व धर्मीय नागरिक, ग्रामविकास अधिकारी, लोकनियुक्त सरपंच, माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, पत्रकार तसेच फत्तेपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शांतता, एकता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत हा जयंती सोहळा अत्यंत उत्साहात आणि शांततेत पार पडला.

Post a Comment

0 Comments