Type Here to Get Search Results !

लग्नासाठी अडीच लाखाचा गंडा चार दिवसात नवरी फरार लग्नासाठी पैसे घेऊन फसवणाऱ्या नऊ जनावर पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल


पहूर प्रतिनिधी-  ता. जामनेर ता. 16

 दिशा लाईव्ह न्यूज--::--जामनेर तालुक्यातील  तळेगांव   येथे ता. 30  मार्च वार सोमवार  रोजी कु. पायल हरिदास तिजारे वय 27 राहणार नागपूर हिने आईला प्यारेलस झालेला आहे. 

तिच्या दवाखान्यासाठी औषध गोळ्यासाठी अडीच लाखाची मागणी केली होती मात्र  ती  2,20,000  हजार रुपये ठरले व तिचा विवाह हिंदू  धर्मा चालीरीती  प्रमाणे पहूर ता. जामनेर येथील  चि.रवींद्र प्रभाकर काळे यांच्याशी झाला. 

लग्नासाठी 220,000 रोख रक्कम व बसता इतर खर्च  30000 असे अडीच लाखाचा गंडा देऊन ता.3  एप्रिल रोजी मध्यरात्री नंतर अडीच ते साडेतीन च्या दरम्यान चिरंजीव रवींद्र काळे सह   घरातील सर्व 5 लोकांना  माझा फंटा या थंड पेय यामध्ये गुंगीचे औषध देऊन घराला बाहेरून कडी लावून फराळ  झाले.

  या संदर्भात लग्न जुळून देणारे एजंट तुषार श्रावण पाटील कोल्हे, राजू प्रकाश  माळी कोल्हे, अजय लोहार गाडी चालक व मालक राहणार कोल्हे गाडी नंबर एम एच २०20एफ वाय 1279   श्रीमती मिनाबाई संजय टाकारे संभाजीनगर,  सौ.अनिता उर्फ पुष्पा ग्यानिराम दंशरे मु.पो.ता. भडगाव,सौ. सरला संतोष तोकडे नाशिक नवरीची मावशी, ज्ञानेश्वर उर्फ नाना राजपूत रा. कंकराळा ता. सोयगाव नवरीचा मामे भाऊ नाव माहित नाही, सौ... नाव माहित नाही  संभाजीनगर  अशा 9 जणांनी मिळून अडीच लाखाचा गंडा मारून फरार झाले आहे. 



 पळून गेलेल्या पत्नीचे आधीच दुसऱ्या मुलाशी लग्न झाले असल्याचे संशय असून तिच्या पर्समध्ये  जुनी नकली  मनी मंगळसूत्राची पोत सापडल्यामुळे संशय येत आहे.    या संदर्भात पहूर ता. जामनेर पोलीस स्टेशनला भादवी कलम 420 व इतर गुन्हे  दाखल करण्यात आले आहे. या संदर्भात पहूर पोलीस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे   व पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील व त्यांचे सहकारी  पुढील तपास करीत आहे.  


  विवाह जोडताना दक्षता घेण्याची गरज

लग्नाच्या नावाखाली आर्थिक फसुनुक टाळण्यासाठी     नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. केवळ मध्येस्थांवर अवलंबून न राहता मुलीच्या घरी जाऊन प्रत्यक्ष माहिती घ्या व मुलीच्या शेजारी पाजारी व गावात चौकशी करूनच कुटुंबाची खातरजामा करावी लग्न जुळून देण्यासाठी कोणी जर पैसे मागत असेल तर सावध व्हा

Post a Comment

0 Comments