Type Here to Get Search Results !

पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बांधव यांचे उपोषण

  


(पाचोरा येथे पत्रकार बांधवांचे उपोषण — अवैध धंदे त्वरित बंद करा! या मागणीसाठी उपोषणाला बसलेले पत्रकार बांधव.)

दिशा लाईव्ह न्यूज --::--- समाजातील बेकायदेशीर व्यवसाय, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी याविरोधात पत्रकारांचा आवाज बुलंद होत आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि जनतेच्या हितासाठी अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई होणे गरजेचे आहे. शासनाने निष्क्रियता सोडून ठोस पावले उचलावीत,अशी मागणी आता जोर धरत आहे.

 पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांचं  आजपासूनउपोषण सूरु झाले आहे.


पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू असून  या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते कैलास तांबे पत्रकार चंदू खरे निलेश पाटील,कुंदन बेलदार यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना या संदर्भात निवेदन देऊन सुद्धा अवैध धंदे चालू असल्याने पाचोरा पोलिस उपविभागीय अधिकारी भाग पाचोरा यांना उपोषणा संदर्भात निवेदन दिलेले असतांना ही सदर कारवाई किंवा धंदे बंद झालेले नाहीत.



 अवैध धंदे पूर्ण पणे बंद न झाल्याने व पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशन च्या प्रभारी अधिकारी कल्याणी वर्मा मॅडम यांनी याची दखल न घेतल्याने सामजिक कार्यकर्ते व पत्रकार बांधवांवर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी उपोषणाची वेळ आणणाऱ्या मुजोर अधिकारी कल्याणी वर्मा यांना पोलीस मुख्यालयी जमा करण्यात यावे-अशी मागणी उपोषण कर्त्यांनी केली आहे.

 सदर उपोषणाला पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ पाटील, यांचा उपोषणाला जाहीर  पाठिंबा असून पत्रकारांची भूमिका ठाम आहे.

Post a Comment

0 Comments