दिशा लाईव्ह न्यूज--::--: : १३/०४/२०२६ रोजी किरण दादा पाटील (शिवसेना उपतालुकाप्रमुख, मिशन जिल्हा परिषद कुरंगी-बांबरुड गट) यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या संकल्पनेतून पाचोरा तालुक्यात महापुरुषांच्या जयंतीनिमित्त एक अभिनव व प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४ एप्रिल) निमित्त पाचोरा पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, सरकारी दवाखाना, पंचायत समिती तसेच नांद्रा येथील सरकारी दवाखाना येथे महापुरुषांच्या प्रतिमा भेट देऊन सन्मानपूर्वक स्थापना करण्यात आली.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश शासकीय कार्यालये व सर्वसामान्य नागरिकांमध्ये महापुरुषांचे विचार, कार्य व आदर्श जिवंत ठेवणे, तसेच नव्या पिढीला प्रेरणा देणे हा आहे.
नांद्रा येथील सरकारी दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी, पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, तहसीलदार तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत प्रतिमा स्थापित करून मानवंदना देण्यात आली.
तसेच पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांना भारताचे संविधान प्रत व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देण्यात आली
या उपक्रमातून महापुरुषांची जयंती उत्सव आदर्श पद्धतीने साजरी करण्याची एक अभिनव परंपरा समाजासमोर उभी करण्यात आली आहे. जयंती केवळ औपचारिक न ठेवता ती कृतीतून साजरी करण्याचा आदर्श किरण दादा पाटील यांनी निर्माण केला असून, तालुक्यात या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.





Post a Comment
0 Comments