दिशा लाईव्ह न्यूज--(कृष्णराव शेळके,लोहारा.)-:-हिंदूधर्म रक्षणासाठी जातपात संप्रदाय विसरून हिंदू म्हणून एकत्र यावे असे आवाहन फैजपूर येथील निष्कलंक धाम मठाचे मठाधिपती प.पु. महामंडलेश्वर जनार्धनहरी महाराज यांनी लोहारा येथील भव्यदिव्य अश्या अभूतपूर्व हिंदू धर्म संमेलनात केले.
लोहारा, ता.पाचोरा येथील जि.प. मराठी मुलींच्या शाळेच्या आवारात दि. २९ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता सकल हिंदू समाजा तर्फे विराट हिंदू धर्म संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यात महामंडलेश्वर जनार्धनहरी महाराज यांनी वरील विचार व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर आंबेवडगाव येथील श्रीकृष्ण मंदिराचे संचालक परमपूज्य महंत येळमकर बाबा, वृंदावन येथील कथाकार प्रवक्ता परमपूज्य आत्मारामानंदजी महाराज, तसेच पाचोरा येथील वारकरी संस्थेचे संचालक शिव कथाकार ह.भ.प. योगेश महाराज धामणगावकर, तसेच पैजपूर येथील निष्कलंकधाम मठाधिपती परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरी महाराज, सावदा येथील दत्त मंदिर संस्थानचे गादी प्रमुख प.पू. मानेकर बाबा शास्त्री महानुभाव, जामनेर येथील गुरुदेव सेवा आश्रमाचे प.पू. श्री श्याम चैतन्य महाराज दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास भक्ती मार्गाचे गिरीष मोरे तसेच विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांत मंत्री योगेश्वरजी गर्गे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते श्रीराम, लक्षण, सीतामाई व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पुजन करुन मल्यार्पण करण्यात आले.
विश्व हिंदू परिषदेला शंभर वर्षे पूर्ण बद्दल देशभरात विविध ठिकाणी हिंदूधर्म जागृती साठी संमेलन आयोजित केलेजात असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांत मंत्री योगेश्वर गर्गे यांनी यावेळी दिली.
विषमुक्त अन्न जनतेला मिळाल्यास शरीर निरोगी होऊन विचार सुद्धा शुद्ध होतील त्यासाठी आमच्या प्रतिष्ठाण तर्फे ठीक ठकाणी शेतकऱ्यांना शेंद्रिय शेतीकडे वळण्याचे आवाहन केले जात असल्याचे दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास भक्तिमार्गाचे अण्णासाहेब गिरिषजी मोरे यांनी यावेळी विचार व्यक्त केले व आपणही विषमुक्त शेती करा असे आवाहन केले.
यावेळी उपस्थित सर्व साधू संतांनी हिंदू धर्म वाचवण्यासाठी एकत्र यावे असे आवाहन केले. यावेळी नियोजनबद्ध कार्यक्रम आयोजन केल्या बद्दल आयोजकांचे कौतुक केले. यावेळी हिंदू बांधव व बघिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर संमेलनाला जामनेर नगरपरिषदेच्या अध्यक्ष साधनाताई महाजन, पाचोरा येथील भाजपच्या नेत्या वैशालिताई सुर्यवंशी, जी.प.मा.सदस्य दिपकसिंग राजपूत संमेलनाला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन शेंदूर्णी येथील आदर्श प्रा. योगिता चौधरीं यांनी केले.
यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पिंपळगाव (हरे) पो.स्टे.च्या कर्तव्यदक्ष सह.पो. निरीक्षक कल्याणी वर्मा व त्यांच्या स्टाफने चोख बंदोबस्त ठेवला होता.



.jpg)
Post a Comment
0 Comments