दिशा लाईव्ह न्यूज -:-धी.शेंदुर्णी से.एज्यु.को-ऑप सोसायटी संचलित, आ.ग.र.गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी येथे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर एस चौधरी यांच्या शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीतील प्रदीर्घ अशा सेवेनंतर वयो काल मर्यादे नुसार सरांना सेवापूर्तीनिमित्त निरोप देण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव काकासो.सागरमलजी जैन यांच्या समवेत संस्थेचे सहसचिव दादासो यु यु पाटील, शेंदुर्णी शहराचे प्रथम नागरिक गोविंद जी अग्रवाल,माजी शिक्षक आमदार सुधीरजी तांबे,प्रमुख व्याख्याते माजी शिक्षणाधिकारी निळकंठजी गायकवाड,युवा नेतृत्व भैय्यासाहेब स्नेहदीपजी गरुड,ज.जि.माध्य. शिक्षक पतपेढीचे माजी अध्यक्ष एस.डी भिरुड,
महिला संचालिका उज्वलाताई काशीद,ज.जि माध्यमिक पतपेढी माजी अध्यक्ष संभाजी पाटील मार्गदर्शक जुक्टो संघटना बापूसो.सुनील गरुड वस्तीगृह सचिव गो.गो.सूर्यवंशी , ज जि माध्यमिक पतपेढी माजी अध्यक्ष आर एच बाविस्कर, अध्यक्ष मुख्याध्यापक संघ जळगांव गोपाल पाटील,जि प्रे सो चेअरमन दगडू विष्णू पाटील, शेदुणी संस्थेचे सह सचिव यु यु पाटील चेअमन वस्तीगृह किशोर मानसिंग पाटील, शेंदुणी संस्था संचालक विजयराव ज्ञानदेवराव गरुड जिल्हा मुख्याध्यापक संघ सचिव आर ए पाटील मुख्याध्यापक जामनेर तालुका अध्यक्ष प्रमोद खलसे, माजी उपसभापती सुधाकर अण्णा बारी माजी पचायत सदस्य डाॅ किरण सुर्यवंशी, प्रदिप धनगर, प्राचार्य संजय भोळे, एस के पाटील जुक्टो संघना जळगांव शैलेश राणे, ए ए पटेल, जैन चाॅरिटीजचे व्यवस्थापक विनोद सिंह राजपूत,ज जि माध्यमिक पतपेढी संचालक सिध्देश्र्वर वाघुळदे, जे पी सपकाळ, जावळेसर, भावेश अहिरवार, आबा पाटील, नाईक सर आरिफ सर या मान्यवरांसह अनेक मान्यवर व्यास मंचावर उपस्थित होते.
प्रथमतः कार्यक्रमाचे प्रास्ताविक किमान कौशल्य विभागाचे प्रमुख शैलेंद्र शेळके यांनी प्रास्ताविकात चौधरी सरांच्या जीवन प्रवासाबद्दल माहिती कथन करत.सरांचे वडील प्राथमिक शिक्षक होते तर पाचवीत असतानाच पितृछत्र हरपल्याने संघर्षमय जीवन जगत असताना त्यांच्या मातोश्री अंजनाबाई या नाचनखेडा गावात सतत दहा वर्ष वि. का. सोसा. संचालिका म्हणून कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं शेंदुर्णी संस्थेत 1991 पासून तर आजतागायत 34 वर्ष 7 महिने एवढा मोठा कालावधी शिक्षक, पर्यवेक्षक, उप मुख्याध्यापक प्राचार्य कमऀचारी प्रतिनिधि,इथपर्यंत इमाने इतबारे सरांनी पार पाडला.
विद्यार्थी हित कर्तव्य म्हणजे राज्य पातळी ते राष्ट्रीय पातळीपर्यंत सरांचे विद्यार्थी खेळामध्ये चमकलेत. त्यांच्या धर्मपत्नी चित्राताई तसेच मुलगा दिनेश व मुलगी प्रियंका या आपल्या कुटुंबाला वेळ देत त्यांनी सामाजिक कार्य तसेच शिक्षक संघटनांच्या माध्यमातून शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम सरांनी केले.
तसेच समाजाशी एकरूप होऊन सामाजिक बांधिलकी त्यांनी जोपासल्याचे प्रास्ताविकातून शेळके सरांनी व्यक्त केले.
तद्नंतर,बऱ्याच मान्यवरांनी सरांच्या जीवनकार्याची यशोगाथा सांगितली त्यात,गोविंदजी अग्रवाल,निळकंठजी गायकवाड,सुधीरजी तांबे,संभाजी पाटील, सुनिल गरड, यु यु दादा पाटील या मान्यवरांसह विद्यार्थी मनोगतात भाग्यश्री नाईक,अथर्व पाटील यांनी सरांच्या आठवणींना उजाळा दिला.
तसेच सत्कारार्थी मनोगतात सरांनी देखील आपल्या भावनांच्या वाटा मोकळ्या करत आपल्यावर प्रेम करणाऱ्या प्रेमी जणांचे तसेच संस्थेचे श्रद्धास्थान आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड अण्णासाहेब भास्करराव गरुड, तसेच दादासाहेब संजय रावजी गरुड व संस्था यांच्या ऋणात राहून मी सदैव संस्थेच्या हित जोपासण्यासाठी तत्पर असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केले.
तद्नंतर अध्यक्षीय मनोगतात शेंदुणी संस्थेचे सचिव काकासो.सागरमल जैन यांनी देखील आपले भावनिक विचार मांडले, प्रमुख उपस्थित मान्यवरांसह उपनगराध्यक्ष शरद बारी,
नगरसेवक शांताराम बापू गुजर,टी.जे पाटील, नगरसेविकापती सुनील शिनकर माजी सरपंच नाचणखेडे हर्षल पाटील,सरपंच कैलास पाटील राजेंद्र पाटील सोयब पटेल अरुण कुलकर्णी, संजय गोतमारे,राजेद्र चौधरी, सुनिल चौधरी,,,एन ओ पाटील,सर,सुनंदाताई,बडोला हायस्कूल मुख्याध्यापिका श्रीमती पी एन पाटील,जुक्टो संघटनेचे शैलेश राणे,जे पी सपकाळे,व्ही के चौधरी,एस एस पाटील, एस टी पाटील, पी पी पाटील,एस के पाटील, पी आर गरुड, पी एल पाटील, राठी बापू, एस टी चिचोले,एस आर निकम, ए व्ही पाटील,पत्रकार विलास अहिरे, पंडित सर,एस टी पाटील,संगमनेर येथील महेश दिघे या मान्यवरांसह आप्तेष्ट नातेवाईक व इतर मित्र परिवार तसेच संस्थेतील आजी-माजी मुख्याध्यापक,महाविद्यालयाचे प्राचार्य, संजय भोळे,उप प्राचार्य,श्याम साळुंखे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उप प्राचार्य बी एम कुमावत, पर्यवेक्षक जे.एस.जुबंळे, विनोद पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सरांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा दादासाहेब संजयरावजी गरुड तसेच भाऊसो.दीपक जी गरुड व इतर पत्रकार बांधव, शिक्षक आमदारकिशोरजी दराडे, ग स सोसायटी अध्यक्ष अजबसिंग पाटील या मान्यवरांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा कळविल्याचे समजले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.जी. पाटील यांनी केले तर आभार पी.पी. पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.











Post a Comment
0 Comments