Type Here to Get Search Results !

सोयगाव: आज भैरवनाथ यात्रा : सोयगावचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रा ; भक्तांतर्फे बारगाड्या ओढण्यासह डाळ बट्टीचे शेकडो नवस


(सोयगाव - महाराष्ट्र राज्यातील एकमेव आलेली सोयगाव येथील लोण्याची भैरवनाथ मुर्ती !)

 दिशा लाईव्ह न्यूज--::---येथील नवसाला पावणाऱ्या ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रोत्सव सालाबादप्रमाणे चैत्र पौर्णिमेला गुरूवारी  (दि.२) रोजी  होणार असल्याने सोयगाव पंचक्रोशीतील भाविकभक्ता सह जनतेत उत्साह संचारला आहे.संस्थांतर्फे मंदिराची रंगरोगोटिसह सर्व परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे 

 महाराष्ट्र राज्यात एकमेव देवस्थान भैरवनाथ महाराजाची मूर्ती लोण्यांपासून तयार करण्यात आली आहे.अश्या प्रकारची एकमेव मुर्ती छत्रपती सभाजीनगर  जिल्ह्यातील सोयगाव शहरपासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून भाविक स्वईच्छेने लोणी घेऊन मंदिरात जातात येथील लोण्यावर वर लोणी टाकून ही भैरवनाथ मुर्ती उभी राहिलेलीआहे.


या मंदिराचे वैशिष्ठ म्हणजे याला नवसाला पावणारा जागृत भैरवनाथ (बहिरोबा) महाराज म्हणतात. येथे दरवर्षी एप्रिल महिन्यात भरणाऱ्या यात्रेसाठी राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, व महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक नवस फेडण्यासाठी येतात .


आख्यायिका :-

या मंदिरात विटाळ झालेल्या महिलेची सावली जरी पडली तरी मंदिरातील लोण्याची मूर्ती पेट असल्याची आख्यायिका प्रचलीत आहे.

यात्रोत्सवाच्या दिवशी शहरातील व पंचक्रोशीतील लाखोच्या संख्येने  नागरिक भैरवनाथ महाराज मंदीरावर नवस फेडण्यासाठी डाळ बट्टी, तसेच चिल्या पिल्यासह अबाल वृद्ध बारागाड्या ओढून आप आपले नवस  फेडत असतात.भैरवनाथ  यात्रेनिमित्ताने महाराष्ट्र सह गोवा गुजरात मध्यप्रदेश येथील भाविक सोयगाव येथे मोठ्या संख्येने या येतात.


                     मंदीरावरील भव्य संभा मडप.


अंखड महाराष्ट्र राज्यात एकमेव लेण्यांची मुर्ती  महाराष्ट्र मध्ये एकमेव देवस्थान भैरवनाथ महाराज आहे की पुर्णपणे लोण्यांपासून तयार करण्यात आली असुन महाराष्ट्रात अश्या प्रकारची ही एकमेव मुर्ती आहे.

(ब्लू लिंकला क्लीक करून व्हिडीओ बघा.)

https://youtu.be/E9gmNw27MF8?si=RELu1DE89aaerLOD


*चंद्रभागेच्या तिरी........*

*दिशा लाईव्ह न्यूज.*

*संपादक-:-दिनेश सोनजी चौधरी*

9309918930

Post a Comment

0 Comments