पहूर प्रतिनिधी -
दिशा लाईव्ह न्यूज --::---तरुण नेतृत्व युवा उद्योजक प्रविण विठ्ठलराव कुमावत आणि उबाठा गटाचे पहुर कसबे चे ग्रामपंचायत सदस्य विक्रम भाऊ घोंगडे यांनी शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबयांच्याहस्ते शिवसेना पक्षात प्रवेश केला.
प्रसंगी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील,शिवसेना संपर्क प्रमुख आ.तुकाराम काते,शिवसेना जळगाव जिल्हा प्रमुख प्रा.समाधान महाजन,जामनेर तालुका प्रमुख ॲड.भरत पवार हे उपस्थित होते.
जामनेर तालुक्यातील पहुर पेठ येथील रहिवासी अन्यायाच्या विरोधात सतत आवाज उठवणारे पत्रकारिता क्षेत्रातील झुंजार व्यक्तिमत्व युवा उद्योजक प्रविण विठ्ठलराव कुमावत यांनी पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्षात प्रवेश करण्याचा करण्याचा निश्चय केला, आणि त्यांच्यासोबत पहुर कसबे ग्रामपंचायतला अपक्ष लढून निवडून येणारे अभ्यास व्यक्तिमत्व युवा नेते विक्रम भाऊ घोंगडे हे निवडून आल्यानंतर त्यांनी ठाकरे (उबाठा) गटात प्रवेश केला होता परंतु पहुर गटातील उबाठा गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी गट सोडून वेगवेगळ्या पक्षात आपले प्रवेश करून घेतले, हे सर्व परिस्थिती लक्षात घेता विक्रम घोंगडे यांनी शिवसेना शिंदे गटात येण्याचे निश्चय करत मुंबई येथे जाऊन शिवसेना पक्षात प्रवेश केला त्यांच्याबरोबर या पक्षप्रवेशात जामनेर तालुक्यातून विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांसह मान्यवर आणि अनेक कार्यकर्त्यांनी जाहिर पक्ष प्रवेश केला.
जामनेर तालुक्यातील पहुर हे गाव भाजपाचा बालेकिल्ला मानला जात होता, आणि त्याच्यातच या दोघांच्या प्रवेशाने राजकीय सूत्र हलताना दिसत आहे.
नक्कीच या पक्षप्रवेशाने पुढील राजकीय घडामोडींना काय वळण येते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
यांच्या या प्रक्षेप्रवेशाने त्यांना शिवसेना संपर्क प्रमुख आमदार तुकाराम काते यांनी समक्ष भेटून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, त्याचबरोबर चोपडा विधानसभेचे आमदार चंद्रकांत सोनवणे,पाचोरा विधानसभेचे आमदार किशोर पाटील यांच्यासह विविध मान्यवर आणि पदाधिकाऱ्यांनी फोनद्वारे संपर्क करुन अभिनंदनाचा वर्षाव केले.
प्रविण कुमावत यांनी माध्यमांशी बोलताना असे सांगितले की
पक्षश्रेष्ठीने माझ्यावर विश्वास दाखवून मला शिवसेना पक्षात सामील करून घेतलं म्हणून त्यांचे सर्वप्रथम आभार आणि लवकरच पहुर शहरांमध्ये शिवसेना पक्षाच्या शाखा उद्घाटन, पक्षाचे संपर्क कार्यालय आणि शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळ्याचे लवकरच आयोजन केले जाणार असुन पक्षाची ताकद आपल्या पहुर शहरासह जामनेर तालुक्यात दाखवायची आहे.

Post a Comment
0 Comments