दिशा लाईव्ह न्यूज --::--मेणगाव, ता. जामनेर येथील रहिवासी असलेले श्री अमोल तुळशीराम चौधरी यांची मुंबई पोलिस दलात निवड होणे ही केवळ त्यांच्या कुटुंबाची नव्हे, तर संपूर्ण गावाची अभिमानाची बाब आहे.
अत्यंत कष्टकरी कुटुंबात जन्मलेल्या अमोल यांचे बालपण संघर्षमय होते. वडील स्व. तुळशीराम किसन चौधरी यांनी शेळीपालन करून, अतोनात मेहनत घेत कुटुंब उभे केले. स्वतःच्या कष्टाने शेती विकत घेऊन मुलांसाठी आयुष्य झिजवणारा हा कर्तृत्ववान पिता काळाच्या पडद्याआड लवकर गेला.
घरात दोन मुले, एक मुलगी आणि आई — अशा परिस्थितीत लहान वयातच जबाबदाऱ्यांचे ओझे अमोल यांच्या खांद्यावर आले. पण त्यांनी हार मानली नाही. जिद्द, चिकाटी आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर त्यांनी सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. आईला सुखात ठेवले, बहिणीचे लग्नही सुखरूप पार पाडले.
आज त्याच जिद्दीचा परिपाक म्हणजे अमोल यांची मुंबई पोलिस दलात निवड. मेणगाव गावातून पोलिस दलात निवड होणारे ते पहिले युवक ठरले आहेत. ही मेणगाव वासीयांसाठी व चौधरी परिवारासाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे.
ही केवळ अमोल यांची वैयक्तिक यशोगाथा नाही, तर संपूर्ण मेणगावच्या स्वप्नांचा, कष्टांचा आणि अभिमानाचा क्षण आहे. त्यांची मेहनत,जिद्द, चिकाटी जरी त्यांची स्वतःची असली, तरी त्यांचा आनंद हा गावकऱ्यांसाठी कोटीपटीने मोठा आहे.
अमोल चौधरी यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

Post a Comment
0 Comments