Type Here to Get Search Results !

पहूर येथे आज शुक्रवारी विराट हिंदू संमेलन ! अंतिम तयारी पूर्ण ; सहभागी होण्याचे आवाहन.


पहूर प्रतिनिधी-:- ता जामनेर

दिशा लाईव्ह न्यूज --::---जामनेर तालुक्यातील पहुर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने क्षत्रिय माळी समाज संघटना संचलित महात्मा फुले मंगल कार्यालयाच्या भव्य सभागृहात आज शुक्रवार दिनांक १७ एप्रील २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून

यात गोपाळकृष्ण वारकरी ज्ञानमंदिर सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ह भ प अनिल महाराज देवळेकर आणि भुसावळ जिल्हा प्रचारक सौरभ संजयराव माटेफळकर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे .

         हिंदू धर्म आणि संस्कृती ही व्यापक आणि सर्वांना सामावून घेणारी आचार पद्धती आहे . 'वसुधैव कुटुम्बकम ' अर्थातच ही पृथ्वीच एक कुटुंब आहे ही भावना हिंदू संस्कृतीने हजारो वर्षापासून अंगीकारलेली आहे . 

आज जागतिक स्तरावर युद्धाचे ढग दाटून आलेले असताना या जगाला आज युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे . अहिंसेचा संदेश देणारे भगवान वर्धमान महावीर , शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध , त्याग आणि बलिदानाची  प्रेरणा देणारे  गुरुनानक देव यांची विचार प्रणाली भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली देणगी आहे .हा विचार मनामनात रुजावा आणि हिंदू संस्कृती हिंदू विचार अधिक बळकट व्हावा या उद्देशाने सामाजिक समरसता निर्माण होऊन एकात्मता नांदावी यासाठी या विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील साधुसंत ,महंत ,प्रवचनकार, प्रबोधनकार यांची उपस्थिती लाभणार आहे .

   या विराट हिंदू संमेलनाला अधिक व्यापकता मिळावी यासाठी विविध भागातून शोभायात्रा निघणार आहेत .

तरी पहुर आणि पंचक्रोशीतील सर्व हिंदू धर्मप्रेमी नागरिक , हिंदू भगिनी बांधव आणि नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे .

Post a Comment

0 Comments