दिशा लाईव्ह न्यूज--::--लोहारा ता.पाचोरा येथे सालाबादाप्रमाणे या वर्षी देखील पालीवाल समाज लोहाराच्या वतीने आज दिनांक 3 एप्रिल शुक्रवार रोजी पालीवाल समाज कुलदेवता माँ आशापूर्णा मातेचा चैत्र नवरात्र उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.
श्री दुर्गामातेचे मंदिरापासून मातेच्या श्री आरतीने शोभायात्रा प्रारंभ होऊन लोहारानगरीच्या प्रमुख रस्त्यावरून मार्गक्रमण करीत बाजार चौकातील श्री महादेव मंदिरात आली. या शोभायात्रेत पालीवाल महिला व युवक तसेच युवतींनी ढोल ताश्याच्या गजरात गरबा तसेच मातेची धर्म ध्वज पताका फडकावत नृत्य सादर केले.मातेच्या जयजयकार घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मिरवणुकीतील मार्गात ठिकठिकाणी स्वागत करण्यात येऊन मातेचे पूजन करण्यात आले.
गेल्या एक तपापासून सदर चैत्र नवरात्रोत्सव साजरा केला जात असून लोहारा,नेरी,नांद्रा,रोटवद, वरखेडी,पाचोरा,देवपिंपरी,जळगांव,भुसावळ, आदी गावाचे पालिपुत्र सहभागी होतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पालीवाल समाज लोहारा यांनी आठवी ते पी एच डी पर्यंत चे शिक्षणात प्राविण्य प्राप्त विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा स्मृती चिन्ह व गौरवपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांची सूची पूढील प्रमाणे...
1)पायल मुकेश पालीवाल
2)गौरी शाम पालीवाल
3)प्रांजल संजय पालीवाल
4) सौ.पूजा रविंद्र पालीवाल पालीवाल
5)सिद्धी प्रवीण पालीवाल
6) रिशीत विलास पालीवाल
7)अनिकेत पंकजकुमार पालीवाल
8) पूनम शरद पालीवाल
9) सौ.पूजा विनय पालीवाल
10) कनिष्का अकलेश पालीवाल
11) साक्षी नरेंद्र पालीवाल
समाजाच्या प्रगतीसाठी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच डॉ.विकास पालीवाल यांनी पालीवाल समाजाचा इतिहास याविषयी सविस्तर माहिती दिली.
यंदाच्या भोजनप्रसादिचे मानकरी दत्तात्रय नत्थुसा पालीवाल, प्रकाश नत्थुसा पालीवाल, प्रदीप भावडूसा पालीवाल यांच्या परिवारातर्फे मातेची आरती करण्यात आली.
कार्यक्रमास महाराष्ट्र पालीवाल परिषदेचे प्रमुख प्रतिनिधी, तसेच पंचक्रोशीतील पालिपुत्र बंधूभगिनी, युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पंकज राधेश्याम पालीवाल यांनी केले तर कार्यक्रम यशस्वितेसाठी युवा मंच कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.याप्रसंगी प्रारंभी कु.स्वरा विकास पालीवाल हिने प्रार्थना सादर केली तर कु. आरुषी अभिषेक पालीवाल हिने हनुमान चालीसा गायन केले.
कार्यक्रमास महाराष्ट्र पालीवाल परिषदेचे प्रमुख प्रतिनिधी, तसेच पंचक्रोशीतील पालिपुत्र बंधूभगिनी, युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय पालीवाल, मुकेश पालीवाल, श्याम पालीवाल, पंकज पालीवाल, शुभम पालीवाल, सतीश पालीवाल, अभिषेक पालीवाल, संदेश पालीवाल, हितेश पालीवाल, शरद पालीवाल, विलास पालीवाल, योगेश पालीवाल इ. पालीपुत्रांनी सहकार्य केले.







Post a Comment
0 Comments