दिशा लाईव्ह न्यूज-:- पाचोरा तालुक्यातील म्हसास येथील शेतकरी कुटुंबातील डॉ.सागर संजय पाटील या तरुणाने कठोर परिश्रम व जिद्दीच्या बळावर एमबीबीएस डॉक्टर पदवी संपादन करून कुटुंबासह संपूर्ण गावाचा अभिमान वाढवला आहे.
डॉ. सागर संजय पाटील असे या होतकरू तरुणाचे नाव असून ते संजय पंढरी पाटील या शेतकऱ्यांचे सुपुत्र आहेत. तर अमृत पंढरी पाटील यांचे पुतणे आहेत.
कुटुंबासोबत डॉ.सागर संजय पाटील
ग्रामीण भागातील साध्या कुटुंबात वाढलेल्या डॉ. सागर पाटील यांनी लहानपणापासूनच डॉक्टर होण्याचे स्वप्न मनाशी बाळगले होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती साधी असतानाही त्यांनी अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या आई-वडिलांनी शेती करत मुलाच्या शिक्षणासाठी घेतलेले कष्ट आज फळाला आले असून त्यांनी एमबीबीएस डॉक्टर पदवी मिळवली आहे.
डॉ. सागर पाटील यांच्या या यशामुळे म्हसास गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले तर यश निश्चित मिळते, याचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
डॉ. सागर पाटील यांनी भविष्यात ग्रामीण भागातील रुग्णांची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली असून मला मिळालेलं हे यश माझे आजोबा पंढरी शंकर पाटील,काका अमृत पंढरी पाटील,आई वडील,भाऊ यांच्या कष्टाने मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.




Post a Comment
0 Comments