Type Here to Get Search Results !

५० वर्षाची परंपरा असलेल्या लोहारा येथे येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न. ग्रामस्थांचे लाभले अनमोल सहकार्य.


दिशा लाईव्ह न्यूज--::---(कृष्णराव शेळके )  पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही १ एप्रिल रोजी चैत्रशुद्ध चतुर्दशीच्या संध्याकाळच्या पवित्र मुहूर्तावर येथील जागृत खंडेरायाच्या नावाने येळकोट येळकोट जय मल्हार च्या जयघोषात बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम मोठ्या भक्ती भावाने संपन्न झाला.


१ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता सोनद नदी ते बाजारपेठ जवळ असणाऱ्या जागृत श्री खंडोबा  महाराज मंदिरापर्यंत बारागाड्या भावभक्तीने ओढल्या गेल्या. 

बारागाड्या ओढण्यापूर्वी भाविक भक्तांकडून गावातून काठी मिरवणूक व खंडेराव भक्तांची सवाद्य मिरवणूक काढण्यातं आली. ही परंपरा गेल्या ५० वर्षांपासून अखंडितपणे चालू आहे. 



लोहारा येथील खंडेरावांचे परमभक्त ,समाजभूषण ,तेली समाजाचे जेष्ठ कै. लोटू नारायण चौधरी यांनी १९७५ सालापासून खंडोबाच्या नावाने चैत्रंशुद्ध चतुर्दशीच्या दिवशी बारा गाड्या ओढण्याची परंपरा सुरू केली होती. त्यांच्या निधनानंतरही ती आजही अखंडितपणे सुरू आहे. 

कै. लोटू नारायण चौधरी यांच्या निधनानंतर त्यांचे लहान चिरंजीव कै. किशोर लोटू चौधरी यांनी जवळपास चार वर्षे बारा गाड्या ओढल्या, मात्र त्यांच्या अकस्मात निधनानंतर कै. लोटू नारायण चौधरी यांच्याच घराण्यातील मूळचे लोहारा येथील रहिवाशी व हल्ली छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेले कै. राजाराम नथ्थु चौधरी यांचे सुपुत्र प्रमोद चौधरी यांनी बारागाड्या ओढल्या.

 सदर कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांसह गावातील भाविकांचा प्रचंड जनसागर उसळला होता.



यावेळी बारागाड्या ओढण्यासाठी अनिल भगत, विकास भगत, महेश भगत (शेंदुर्णी), पांडुरंग चौधरी, विजय चौधरी, दिगंबर नथ्थु चौधरी, सुनील चौधरी, प्रमोद चौधरी, डॉ. प्रिंतेश चौधरी, अशोक चौधरी, गोकुळ चौधरी (बापू). प्रताप चौधरी, ईश्वर चौधरी, दिलीप चौधरी, दिनेश चौधरी, प्रकाश चौधरी, उत्तम चौधरी, बापू भास्कर चौधरी, मनोज चौधरी, उखा भगत, तसेच गावातील कैलास चौधरी, अमृत चौधरी, शांताराम चौधरी,या सह पहुर येथील भगत मंडळी व समस्त पवार परिवाराचे सदस्य व इष्ट नातेवाईक आणि ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले होते. 

बारागाड्या ओढल्यानंतर रात्री भगत परिवारातर्फे महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होता.

Post a Comment

0 Comments