दिशा लाईव्ह न्यूज..--: येथील श्री. विवेक वर्धिनी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पाचोरा या प्रतिष्ठित पतसंस्थेच्या संचालक पदी सुरेश धनराज तांबे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पतसंस्थेच्या कार्यात नवे बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त होत असून परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या निवडीच्या निमित्ताने दि. २७ एप्रिल २०२७, सोमवार रोजी पतसंस्थेच्या वतीने एक छोटेखानी पण उत्साहपूर्ण सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात सुरेश तांबे यांचा शाल, पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक कार्याची, प्रामाणिकपणाची व सहकार क्षेत्रातील योगदानाची प्रशंसा करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन सदाशिव (आबा) त्र्यंबक पाटील, व्हाईस चेअरमन आशिष रमेशचंद्र लाहोटी, संचालक वसंत गोविंदा महाजन, मिलिंद नामदेव गायकवाड, शांताराम झगा पाटील, सचिन पुरुषोत्तम देशपांडे तसेच संचालिका श्रीमती निर्मला सुरेश अमृतकर, सौ. नीलिमा प्रकाश पाटील, सौ. प्रियंका विनोद पाटील उपस्थित होते. याशिवाय मॅनेजर धर्मेश अग्रवाल यांच्यासह संजय कुलकर्णी, नंदू कुलकर्णी, अनिल पाटील, भरत तिवारी, सतीश जाधव, संजय नालकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरेश तांबे हे सामाजिक व सहकार क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी विविध उपक्रमांद्वारे लोकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे पतसंस्थेच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या निवडीमुळे पाचोरा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments