Type Here to Get Search Results !

तोरनाळेनजीक दुचाकीची ट्रॅक्टरला धडक पती-पत्नीचा जागीच मृत्यू दीड वर्षांची चिमुकली सुदैवाने बचावली-खडके परिवारावर दुःखाचा डोंगर.



दिशा लाईव्ह न्यूज--::--- मुलीला डॉक्टरांकडे दवाखान्यात दाखवून घराकडे परत जात असलेल्या दुचाकीवरील पती-पत्नीचा बुधवारी रात्री जागीच मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना तोरनाळे गावाजवळ घडली. सुदैवाने दीड वर्षाची मुलगी बचावली आहे. 

जामनेर देऊळगाव गुजरी रस्त्यावर हा अपघात झाला. गोपाल वासुदेव खडके (३६) व सोनाली गोपाल खडके (३० रा. सावळतबारा, ता. सोयगाव) हे पती पत्नी फत्तेपुर येथुन सावळतबारा गावाकडे परत जात असतांना तोरनाळे गावाजवळ रस्त्यावर उभे असलेल्या नादुरुस्त ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. यात खडके दांपत्याचा जागीच मृत्यु झाला. जामनेर येथील आरोग्यदुत जालमसींग राजपुत यांनी त्यांचे मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात रात्री आणले. या घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली असुन गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे.



तोरणाळा येथील स्मशानभूमी जवळ झालेल्या या भीषण अपघगातात एक वर्षाची चिमुकली मुलगी चमत्कारिकरित्या बचावली आहे.

 हा अपघात इतका भीषण होता की, धडक बसल्यानंतर गोपाळ खडके आणि सोनाली खडके हे दोघेही रस्त्यावर फेकले गेले. गंभीर दुखापत झाल्यामुळे या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. 

या अपघातात त्यांच्या सोबत असलेली त्यांची एक वर्षाची लहान मुलगी देखील होती. मात्र, निसर्गाचा चमत्कार म्हणावा की दैव बलवत्तर, इतक्या भीषण अपघातात या चिमुकलीचे प्राण सुदैवाने वाचले आहेत.

Post a Comment

0 Comments