पहूर प्रतिनिधी--ता. जामनेर :
दिशा लाईव्ह न्यूज---:::----पहूर येथील शिवनगर परिसरातील रहिवासी, समर्थ विठ्ठल मंदिराचे चोपदार तसेच ह.भ.प. ज्ञानेश्वर भागवत बावस्कर यांचे वडील ह.भ.प. भागवत पुंडलिक बावस्कर यांचे शुक्रवारी पहाटे सव्वा पाच वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून धार्मिक क्षेत्रातील एक सेवाभावी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
भागवत बावस्कर यांनी आयुष्यभर भक्ति आणि सेवाभाव जपत विविध किर्तन सप्ताह, धार्मिक कार्यक्रमांमध्ये चोपदार म्हणून निस्वार्थीपणे सेवा बजावली. त्यांच्या साध्या, शांत आणि भक्तिमय स्वभावामुळे त्यांना परिसरात मानाचे स्थान होते. अनेक धार्मिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आदर होता.
त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक व मोठा मित्रपरिवार असा शोकाकुल परिवार आहे. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच परिसरातील नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.
दुपारी दोन वाजता वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Post a Comment
0 Comments