Type Here to Get Search Results !

राज्यस्तरीय शिक्षक सेवा सन्मान सोहळा 2026 शिर्डी येथे उत्साहात संपन्न


दिशा लाईव्ह न्यूज --::---(दिनेश चौधरी, लोहारा ) शिक्षक फाउंडेशनद्वारे संचलित महाराष्ट्र शिक्षक पॅनल (MSP) आयोजित राज्यस्तरीय शिक्षक सेवा सन्मान सोहळा 2026 दिनांक 12 मे रोजी शिर्डी येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. राज्यभरातील शिक्षक, समन्वयक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा थाटामाटात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9 वाजता पुरस्कारार्थींच्या नावनोंदणीने झाली. सर्व पुरस्कारार्थ्यांचे पारंपरिक पद्धतीने फेटा बांधून स्वागत करण्यात आले. त्यानंतर हलगीच्या तालावर आणि पुष्पवृष्टी करत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली, ज्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.



सकाळच्या सत्रात स्वरांजली संकुल, नाशिक प्रस्तुत सुवर्णा क्षीरसागर यांचा ‘सूरबहार’ हा सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सुरेल कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी भरपेट भोजन व मठ्ठ्याचे वाटप करण्यात आले.

दुपारच्या सत्रात दुपारी 2 ते सायंकाळी 6 या वेळेत मुख्य पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. कला, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत हा सोहळा अधिकच रंगला.



या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध सिनेअभिनेत्री भार्गवी चिरमुले, कवी रोहित शिंगे, कवयित्री गुंजन पाटील, तसेच साईबाबा संस्थान शिर्डी ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पत्नी रंजनाताई गाडीलकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे अध्यक्ष दीपक चामे तर सचिव सतीश कोळी हे होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य समन्वयक विकी येलमटे यांनी केले, तर राज्य समन्वयक सीमा पांढरकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व पुरस्कारार्थ्यांना बुके, ट्रॉफी आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.



प्रमुख पाहुण्यांच्या मनोगतातून कार्यक्रमाला विशेष रंगत आली. कवयित्री गुंजन पाटील यांनी प्रेम आणि धर्मनिरपेक्षतेवर आधारित स्वरचित कविता सादर केली, तर कवी रोहित शिंगे यांनी ‘चुंबळ’ ही कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी शिक्षकांचे समाजातील अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले. विशेष म्हणजे त्यांनी आपले मनोगत संपल्यानंतर स्टेजवर नतमस्तक होऊन शिक्षकांना अभिवादन केले, ज्यामुळे उपस्थितांच्या मनात त्यांनी विशेष स्थान निर्माण केले.



अध्यक्षीय भाषणात दीपक चामे यांनी महाराष्ट्र शिक्षक पॅनलचा प्रवास, संघटन कौशल्य आणि माणसे जोडण्याची ताकद यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राज्य समन्वयक राजश्री पाटील यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राज्य व जिल्हा समन्वयकांनी अथक परिश्रम घेतले.

 जळगाव जिल्ह्यातून राज्य उपाध्यक्ष पंकजकुमार पालीवाल, जिल्हा समन्वयक सुरेश चव्हाण, अनिल पाटील, रवींद्र ठाकरे, पपीता जोशी, डॉ. अर्चना विसावे, विशाल धनगर, सुशांत जगताप, गणेश निकम, यशराज निकम, सुरेश गावंडे, सुनील बडगुजर आदी मान्यवर उपस्थित होते.



जळगाव जिल्ह्यातील गौरवप्राप्त आदर्श शिक्षक/शिक्षिका

श्रीमती अनिता शशिकांत पाटील

श्रीमती पल्लवी अरुण मोरे

श्रीमती सुनयना रंगनाथ मोरे

श्री मालोजी जयवंतराव पवार

श्रीमती स्वाती सुनील बडगुजर

सौ. प्राजक्ता तुषार जवळकर

श्रीमती शर्मिला सुभाष खैरनार

श्री संदीप रमेश अहिरे

श्रीमती योगेश्री मधुकर पाटील

श्रीमती शैला गंगाधर बैसाणे

श्रीमती छाया वसंतराव बिऱ्हाडे

श्री सत्तेसिंग उदलसिंग राठोड

श्रीमती स्वाती शंकरराव मोराणे

श्री निलेश रोहिदास पाटील

श्री संजय तुकाराम पाटील

श्री गोविंदराव शिवराम गायकवाड

एकंदरीत, शिक्षकांचा सन्मान आणि त्यांच्या कार्याची दखल घेणारा हा सोहळा अत्यंत प्रेरणादायी व अविस्मरणीय ठरला.

Post a Comment

0 Comments