पाचोरा तालुक्यातील कोल्हे येथील रहिवासी देवकाबाई संतोष गोपाळ या वृद्ध महिला आज सकाळपासून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या काही वर्षांपासून त्या तीव्र डोकेदुखीच्या आजाराने त्रस्त होत्या. यासाठी त्यांच्या डोक्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. मात्र शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या डोकेदुखीत वाढ झाल्याने त्या मानसिकदृष्ट्याही खचल्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, आज (दिनांक ०५ मे २०२६) मंगळवार रोजी सकाळी अंदाजे साडेनऊ वाजताच्या सुमारास घरात कोणीही नसताना देवकाबाई यांनी घर सोडले. त्या नंतर परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला, मात्र अद्याप त्यांचा काहीच ठावठिकाणा लागलेला नाही.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, सततच्या असह्य वेदनांमुळे त्या खूपच त्रस्त झाल्या होत्या आणि “जगण्यापेक्षा मरण आलेले बरे” अशी हताश प्रतिक्रिया व्यक्त करत होत्या. त्यामुळे त्यांच्या बेपत्ता होण्याच्या घटनेने कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, फोटोतील वर्णनाशी जुळणाऱ्या या आजीबाई कुठेही आढळल्यास त्वरित खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
📞 संपर्क क्रमांक: 8390762124 / 9561649695
पोलिस प्रशासनालाही या प्रकरणाची माहिती देण्यात येणार असून शोधमोहीम सुरू आहे. नागरिकांनी सतर्क राहून या वृद्ध महिलेला शोधण्यात सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
*********************************************
अखेर आजीबाई सुखरूप सापडल्या--नातेवाईकांनी मानले दिशा न्यूजचे आभार..
दिशा लाईव्ह न्यूज -:-- पाचोरा तालुक्यातील कोल्हे येथील बेपत्ता झालेल्या देवकाबाई संतोष गोपाळ या वृद्ध महिला अखेर जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुखरूप सापडल्या आहेत.
नेमकी घटना काय होती?
बेपत्ता: ५ मे २०२६ रोजी सकाळी ९:३० च्या सुमारास त्या घरातून निघून गेल्या होत्या.
कारण: शस्त्रक्रियेनंतर वाढलेली तीव्र डोकेदुखी आणि मानसिक तणावामुळे त्या हताश होत्या.
शोध: सोशल मीडिया आणि 'दिशा न्यूज'वर बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर, जागरूक नागरिकांनी आणि नातेवाईकांनी माहिती दिली.
कुटुंबीयांचे आभार:
आजीबाई सुखरूप सापडल्याने कुटुंबाने सुटकेचा निश्वास सोडला असून, मदतीसाठी धावून आलेल्या नागरिकांचे आणि प्रसिद्धी माध्यमांचे मनापासून आभार मानले आहेत.

Post a Comment
0 Comments