Type Here to Get Search Results !

No title

 🕯️ दुःखद निधन 🕯️


दिशा लाईव्ह न्यूज-:- लोहारा येथील सामाजिक कार्यकर्ते चेतन धनराज काकडे यांच्या मातोश्री, स्व. ग. भा. निर्मलाबाई धनराज काकडे (वय ६८) यांचे आज दिनांक १८ रोजी दुपारी १:३० वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अत्यंत दुःखद निधन झाले.

निर्मलाबाईंच्या अकस्मात जाण्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाने काकडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्या आबा पंडित काकडे, हिरालाल काकडे, राजेंद्र काकडे व युवराज काकडे यांच्या मोठ्या वहिनी होत्या.

मन हेलावून टाकणारी बाब म्हणजे, उद्याच त्यांच्या सख्या पुतणीचा विवाह ठरलेला होता. आनंदाचे वातावरण असताना अचानक आलेल्या या दुःखद प्रसंगाने कुटुंबीयांवर आभाळ कोसळल्यासारखे झाले आहे. काही वेळापूर्वीच त्या सर्वांना भेटून, प्रेमाने बोलून घरी परतल्या होत्या. घराचे बांधकाम सुरू असल्याने त्यांनी स्वतःहून मजुरांना सरबत देऊन आपुलकी दाखवली… पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. काही क्षणांतच त्यांची प्राणज्योत मालावली.

येथील डॉ. महाजन यांनी त्यांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र नियतीपुढे सर्व प्रयत्न अपुरे ठरले.

त्या जुन्या काळातील सुप्रसिद्ध टेलर्स स्व. धनराज पंडित काकडे (काकडे टेलर्स) यांच्या पत्नी होत. साधी, प्रेमळ आणि कुटुंबवत्सल अशी त्यांची ओळख होती. आपल्या मुलाचे लग्न व नव्या घरात संसार फुलताना पाहण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले… हीच बाब अधिक वेदनादायक ठरते.

त्यांची अंत्ययात्रा आज रात्री ठीक ८ वाजता संत जगनाडे चौक येथून निघणार आहे.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो 🙏

भावपूर्ण श्रद्धांजली 💐

Post a Comment

0 Comments