पहूर, ता. जामनेर :
दिशा लाईव्ह न्यूज ---:::----महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाने यंदाच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) निकालात ८७.९१ टक्के यश संपादन करत आपली उज्वल परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेचे प्रदर्शन करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
यंदाच्या परीक्षेत मुनीराबी शेख खलील हिने ८४.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. अश्विनी प्रवीण चौधरी हिने ८४.४० टक्के गुणांसह द्वितीय, तर माहेश्वरी संजय धनगर हिने ८३ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
तसेच गायत्री योगेश पवार (८०%), प्रणिता समाधान क्षिरसागर (७९.४०%), महेंद्र समाधान बोरसे (७८.४०%), गायत्री दीपक जवखेडे (७८%), कोमल पंढरी मोहणे (७८%), रोहन अनिल चव्हाण (७७.६०%), सोमेश दिनकर घोंगडे (७७.२०%), नयन सुनील राऊत (७७.२०%) आणि आयान आशिक पिंजारी (७७.२०%) यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले.
विद्यालयाच्या या यशाबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तसेच संचालक मंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

Post a Comment
0 Comments