Type Here to Get Search Results !

कासमपुरा विद्यालयाचा दहावीचा निकाल ९३.९७% — यशाची परंपरा कायम



 दिशा लाईव्ह न्यूज --::-- लोहारा, ता.पाचोरा येथून जवळच असलेल्या कासमपुरा येथील  रामसीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासमपुरा यांनी फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेत घवघवीत यश संपादन करत उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.

यंदा विद्यालयातून एकूण ८३ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ७८ विद्यार्थी उत्तीर्ण होत शाळेचा एकूण निकाल ९३.९७% इतका लागला आहे. यामध्ये ४६ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, तर २८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

🌟 गुणवंत विद्यार्थ्यांची यशोगाथा :

🥇 प्रथम: किरण रामधन राजपूत — ९१%

🥈 द्वितीय: डिंपल सचिन थोरात — ९०%

🥉 तृतीय: तेजस सत्यवान चौधरी — ८९.८%

🥉 तृतीय: हर्षल रघुनाथ शिंदे — ८९.८%

विद्यालयाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे संस्थेचे चेअरमन भाऊसौ योगराज कांतीलाल राजपूत, सचिव ताईसो मेघाताई राजेंद्र राजपूत, संचालिका ताईसो शितल कांतीलाल राजपूत तसेच सर्व संचालक मंडळ यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.

याशिवाय विद्यालयाचे प्राचार्य, सर्व विषय शिक्षक, तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांच्या मेहनतीला आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला लाभलेले हे यश भविष्यातही अशीच प्रेरणा देत राहो, हीच अपेक्षा

Post a Comment

0 Comments