Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र दिनी पोलिसांची मोठी कारवाई; शेंदुर्णीत गोवंश मांस विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या



​शेंदुर्णी (प्रतिनिधी):

 दिशा लाईव्ह न्यूज --::---महाराष्ट्र दिनाच्या उत्साहात संपूर्ण राज्य असताना, शेंदुर्णी येथे गोवंश कत्तल आणि मांस विक्री करणाऱ्यांवर पहूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या धडक मोहिमेत १० जनावरांची सुटका करण्यात आली असून, तीन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे.

नेमकी घटना काय?

​दिनांक १ मे २०२६ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास शेंदुर्णी येथील कुरेशी वाड्यात काही जनावरे कत्तलीसाठी आणली असून तिथे मांस विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती पहूर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी विलंब न लावता घटनास्थळी धाड टाकली.

पोलिसांची धडक कारवाई

​पहूर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कसाई वाड्यावर छापा टाकला. या कारवाईत:

  • ​कत्तलीसाठी आणलेली १० जनावरे ताब्यात घेण्यात आली.
  • ​घटनास्थळावरून मांस विक्री करणाऱ्या आरोपींना रंगेहात पकडण्यात आले.
  • ​आरोपींविरुद्ध पहूर पोलीस स्टेशनमध्ये अपा. क्र. ११६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३२५, सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५ (अ), ९ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक केलेले आरोपी

​१. शेख जमीन शेख लतीफ (वय ४८, रा. शेंदुर्णी)

२. सलमान शेख शिकलकर (वय २०, रा. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर)

३. कुरेशी अफताफ अब्दुल रफिक उर्फ अलताफ शेख (वय २५, रा. शेंदुर्णी)

​अटक करण्यात आलेल्या या तिन्ही आरोपींना न्यायालयाने ४ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी (PCR) सुनावली आहे. या प्रकरणातील इतर फरार आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई

​सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत ढिवरे, अपर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव) कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली ए.पी.आय. प्रमोद कठोरे, पी.एस.आय. नंदकुमार शिंब्रे व त्यांच्या संपूर्ण पथकाने फत्ते केली.

​या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिंब्रे हे करत आहेत. महाराष्ट्र दिनीच झालेल्या या मोठ्या कारवाईमुळे परिसरात अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Post a Comment

0 Comments