दिशा लाईव्ह न्यूज :- : पुण्याजवळील लोहगड किल्ला येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. पिंपरी-चिंचवड येथील नामांकित बांधकाम व्यावसायिकाचा एकुलता एक मुलगा केतन अग्रवाल याचा मृत्यू हा अपघात नसून नियोजित कटातून झाल्याचे तपासात समोर आले आहे.
केतन अग्रवाल हा कुटुंबातील लाडका मुलगा असून त्याचे लग्न येत्या नोव्हेंबर महिन्यात राजस्थानमधील उदयपूर येथे मोठ्या थाटामाटात होणार होते. लग्नासाठी पॅलेस बुकिंग, प्रवास व्यवस्था अशा सर्व तयारी पूर्ण झाल्या होत्या. दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
दरम्यान, गुरुवारी केतनच्या भावी पत्नीचा वाढदिवस असल्याने दोघे लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी फोटो काढताना केतनचा तोल जाऊन तो दरीत पडल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले. सुमारे तीन तासांच्या प्रयत्नानंतर बचाव पथकाने त्याचा मृतदेह बाहेर काढला.
मात्र, लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केल्यानंतर प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. मोबाईल कॉल रेकॉर्ड, लोकेशन डेटा आणि घटनास्थळावरील साक्षीदारांच्या जबाबातून संशय निर्माण झाला. पुढील तपासात धक्कादायक बाब समोर आली की, केतनला त्याच्या भावी पत्नीच्या प्रियकराने दरीत ढकलून दिले होते.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, सिया गोयल हिला हे लग्न मान्य नव्हते आणि तिचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या नात्यात अडथळा ठरत असलेल्या केतनला दूर करण्यासाठी तिने आपल्या प्रियकराच्या मदतीने हा कट रचल्याचा संशय आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने केतनला किल्ल्यावर नेऊन योग्य संधी साधून त्याला दरीत ढकलण्यात आले.
या घटनेमुळे अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ज्या मुलाच्या लग्नाची तयारी सुरू होती, त्याच मुलाच्या अंत्यसंस्काराची वेळ येणे ही अत्यंत वेदनादायक बाब आहे. कुटुंबीयांना या घटनेचा जबर धक्का बसला असून परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून भावी पत्नीचा नेमका सहभाग, प्रियकराला मिळालेली मदत आणि हा कट किती दिवसांपासून रचला जात होता याचा शोध घेतला जात आहे.
ही घटना केवळ एक गुन्हा नसून नातेसंबंधांमधील विश्वास आणि प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.
**********************************************
केतन अगरवाल च्या वडिलांच्या बोलण्यातून जी माहिती मिळाली आहे त्याच्यानुसार हे अरेंज मॅरेज होते दोन्ही फॅमिलीच्या म्हणण्याने ठरले होते आणि मुलीने मुलगा पसंत आहे हे सांगितलेले होते. प्री-वेडिंग शूट बालीला करण्याचे ठरले होते तेव्हा केतन,सिया,केतन ची बहीण, आणि अजून एक मित्र असे चार लोकं निघालेले होते. सर्वांचे पासपोर्ट सगळ्यांचे महत्त्वाच्या डॉक्युमेंट्स,चलन, वस्तू एका मोठ्या पाऊच मध्ये ठेवलेल्या होत्या. एके ठिकाणी फूड कोर्टला गाडी थांबल्यानंतर सियाने माझा मोबाईल गाडीमध्ये विसरला आहे म्हणून सगळे लोक फूड कोर्टला थांबलेले असताना ती गाडीमध्ये परत आलेली होती. नंतर मुंबई एअरपोर्टवर गेल्यावर सगळ्यांचे पासपोर्ट इंटॅक्ट होते फक्त केतनचा पासपोर्ट मिसिंग होता.
18 जून चा प्रसंग घडण्याच्या अगोदर 14 जूनला सुद्धा सिया गोयल केतनला घेऊन लोहगडला गेलेली होते. तिथे तिने त्याला खाली पडावा म्हणून धक्का दिलेला होता परंतु त्याने एका फांदीला धरले आणि तो वाचला त्यावेळी तिने साप साप म्हणून आरडाओरडा केला त्याला मिठी मारली आणि त्यालाही खरोखर असे वाटले की साप आल्यामुळे आपल्याला वाचवण्यासाठी तिने आपल्याला ढकलले.
थोडसं विषयांतर होईल परंतु एखादी वाईट घटना घडण्याच्या अगोदर आपल्याला निसर्गातून सूचना मिळतात. 14 जून ला जेव्हा या पोरीने यांच्या मुलाला ढकलून दिले होते आणि नंतर साप साप म्हणून ओरडली आणि त्याला मिठी मारली ही गोष्ट त्यांनी घरी येऊन आई बापाला सांगितली त्यावेळी गेल्या 40 वर्षापासून अतिशय हुशार आणि चाणाक्षपणे व्यापार करणाऱ्या करोडपती आई-वडिलांच्या लक्षामध्ये ही गोष्ट का आली नसेल की इथे काहीतरी पाणी मुरत आहे? स्वतः केतनच्या पण लक्षात आले नसेल का? जर आले नसेल तर अतिशय दुर्दैवी गोष्ट म्हणावी लागेल. लोक Sixth Sense, Premonition, Hunch, Foreboding, Memory Palace अशा गोष्टी फक्त गमतीच्या गप्पा म्हणून का सोडून देत असतील. जेव्हा की सगळं जग विरोधात गेलेलं असताना आपलं अंतर्मन आपल्याला अगोदर चाहूल देते,सावध करते. 14 जूनच्या घटनेने हे लोक सावध झाले असते तर ही दुर्घटना नक्की टळू शकली असती!







Post a Comment
0 Comments