दिशा लाईव्ह न्यूज :-: सह्याद्री वृत्तवाहिनीवरील प्रसिद्ध अँकर सुनयना चाळके यांची द युवा ग्रामीण पत्रकार संघच्या महिला राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पत्रकार क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सुनयना चाळके यांनी आपल्या कार्यातून कष्ट, प्रामाणिकपणा आणि निष्ठेचा दीप सतत प्रज्वलित ठेवला आहे. जनसेवेच्या ध्येयासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले असून द युवा ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेने त्यांच्या कार्याची दखल घेत ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
त्यांच्या या यशस्वी वाटचालीमुळे अनेक महिलांना प्रेरणा मिळत असून पत्रकार संघाची प्रतिष्ठा अधिक उंचावली आहे. संघटनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, ग्रामीण पत्रकारिता बळकट करणे आणि समाजातील प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचे काम त्या अधिक जोमाने करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या निवडीबद्दल संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अन्सार शेख तसेच सर्व पदाधिकारी,जिल्हाध्यक्ष व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment
0 Comments