Type Here to Get Search Results !

जेष्ठ साहित्यिक श्री.बाळासाहेब कोठुळे हे मानद डॉक्टररेट पदवीने सन्मानीत.





दिशा लाईव्ह न्यूज--::---अचिव्हर अवॉर्ड कौन्सिल भारत सरकारच्या एम सी ए अंतर्गत नोंदणीकृत संस्थेकडून दिनांक- २०।६। २०२६रोजी दिल्ली येथील भव्य कार्यक्रमात

सामाजिक कार्याच्या विकासासाठी आणि त्यांच्या वचन बद्धतेची दख्खल म्हणून पाथर्डी तालुक्यातील चितळी येथील ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब महादेव कोठुळे यांना डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले. आणि शिवाय त्या संस्थेचे आमरण सदस्यत्व सुद्धा त्यांना मिळाले असून या पदवीने त्यांच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

      भारत सरकारच्या एम. सी. ए.अंतर्गत, मेक इन इंडिया, निती आयोग, विधी आणि न्याय मंत्रालय, ,

 अनुक्रमांक - A. A.C. OO1202 नोंदणी क्रमांक 88 9 00 4 5 9 9 6 6 त्यांची भारत सरकारच्या अधिकृत संघटनेकडे नोंद झाली आहे.

       पत्रकारिता क्षेत्रात गेली पंधरा वर्षापासून ते कार्य करत आहे. निर्भीड व निपक्षपाती पत्रकारितेबद्दल त्यांची सर्वत्र ख्याती आहे. महाराष्ट्रातील अनेक नामवंत वर्तमानपत्रामधून त्यांनी सातत्यपूर्ण लिखाण केले आहे. दैनिक पुढारी कोल्हापूर, दैनिक पुणे प्रभात, दैनिक गावकरी नाशिक, दैनिक सार्वमत श्रीरामपूर या दैनिकाबरोबर महाराष्ट्राची भूमी, नगर परिवर्तन या  साप्ताहिकांमधूनही त्यांनी लिखाण केले आहे. तसेच अनेक ऑनलाईन ई पेपर मधून सध्या ते लिखाण करत आहेत दैनिक लोक शक्ती, दैनिक लोक परिवर्तन, दैनिक रोखठोक, दैनिक साहित्य सेवा, दैनिक साहित्य तेज या पेपरमधून त्यांचे लिखाण चालू आहे. पत्रकारिता क्षेत्रात राज्यस्तरीय पुरस्काराबरोबर त्यांना इंटरनॅशनल सन्मानाने सन्मानित करण्यात आले. अनेक नामांकित संस्थेचे त्यांना उत्कृष्ट पत्रकारतेचे अवॉर्ड मिळाले आहे. त्यांचे साहित्य क्षेत्रातीसाठी तीस वर्षापासून योगदान आहे. अनेक कवी संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यासारख्या साहित्यिक कार्यक्रमांमधून त्यांचा संपूर्ण महाराष्ट्राला परिचय आहे. साहित्य क्षेत्रात त्यांना मानणारा मोठा मित्र परिवार असून अनेक साहित्यिक कार्यक्रमाचे ते उत्कृष्ट प्रकारे सूत्रसंचालन करतात. या सर्व कार्याची या संघटनेने दखल घेतली असून त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल त्यांना मानद डॉक्टर ही दिल्ली येथील एका भारत सरकारच्या सामाजिक संस्थेने ही पदवी बहाल केली आहे.

      जेष्ठ साहित्यिक श्री.बाळासाहेब कोठुळे सरांना डॉक्टरेट ही पदवी मिळाल्याबद्दल नेवासा तालुक्यातील निंबारी येथील कवी गोरक्षनाथ पवार ,प्रा.मोहिनीराज होन सर,डाॅ.बाळासाहेब वाहूरवाघ, अॅड..संजय माकोणे सर, ज्येष्ठ कवी आत्माराम शेवाळे, कवी राजेंद्र उदारे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments