दिशा लाईव्ह न्यूज---(दिनेश चौधरी,लोहारा)- : लोहारा, ता.पाचोरा येथील क्षत्रिय काच माळी समाज मंगल कार्यालय, लोहारा येथे अखंड हरिनाम संकीर्तन व श्रीमद्भागवत महापुराण कथा सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सप्ताहाचे हे ३३ वे वर्ष असून, भाविकांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहाचा प्रारंभ सोमवार, दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी असून, सांगता मंगळवार, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी होणार आहे. सप्ताहादरम्यान दररोज सकाळी काकडा भजन, सकाळी श्रीमद्भागवत कथा, तसेच रात्री हरिकीर्तन व हरिजागर असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
या सप्ताहाचे भागवताचार्य ह.भ.प. अटल महाराज काळे बेटावदकर असून, त्यांच्या रसाळ वाणीतून श्रीमद्भागवत कथेचे निरूपण होणार आहे. सप्ताहात विविध दिवशी ह.भ.प. काशिनाथ महाराज कोल्हेकर, ह.भ.प. पांडुरंग महाराज आव्हाळकर, ह.भ.प. महेश संजय महाराज सावखेडा, ह.भ.प. तुकाराम महाराज चिंचोळ, ह.भ.प. गजानन महाराज वसाडेकर, ह.भ.प. गजानन महाराज भोमाडेकर, ह.भ.प. पुंडलिक महाराज चिखली, तसेच ह.भ.प. सुनील महाराज कर्की यांचे कीर्तन होणार आहे.
दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते ११ वाजता संत सावतामहाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रम होणार असून, त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक सप्ताहासाठी विविध मान्यवरांचे सहकार्य लाभत असून, क्षत्रिय काच माळी समाज राजमंडळ व रास्ता वारकरी मंडळी, लोहारा यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.
या भक्तिमय सप्ताहाचा लाभ लोहारा व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


Post a Comment
0 Comments