Type Here to Get Search Results !

फैजपूर : कु. त्रिशा श्रीकांत चौधरी हिचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश


दिशा लाईव्ह न्यूज --::--सावदा येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलची गुणवंत विद्यार्थिनी कु. त्रिशा श्रीकांत चौधरी हिने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता चौथीच्या प्राथमिक शिष्यवृत्ती (PSE) परीक्षा – २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करून शाळा, पालक आणि परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे.

दि. २६ एप्रिल २०२६ रोजी घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल २५ जुलै २०२६ रोजी जाहीर झाला. या परीक्षेत कु. त्रिशाने एकूण १८० गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. तिच्या या यशामुळे शाळेत तसेच परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कु. त्रिशा ही प्रा. डॉ. श्रीकांत उल्हास चौधरी व सौ. यामिनी श्रीकांत चौधरी यांची कन्या आहे. लहानपणापासूनच अभ्यासू, जिज्ञासू व मेहनती असलेल्या त्रिशाने सातत्यपूर्ण अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या प्रोत्साहनाच्या बळावर हे यश संपादन केले आहे.

तिच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, सहाध्यायी, पालक, नातेवाईक तसेच हितचिंतकांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन करून भविष्यातही अशीच उज्ज्वल शैक्षणिक भरारी घेण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

कु. त्रिशाच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असून कठोर परिश्रम, सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे तिने आपल्या यशातून सिद्ध करून दाखविले आहे. तिच्या उज्ज्वल शैक्षणिक भवितव्यासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments