Type Here to Get Search Results !

जामनेर तालुक्यातील पाळधी जिल्हा परिषद केंद्रशाळेचा दैदिप्यमान निकाल; इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत ७ विद्यार्थी पात्र



दिशा लाईव्ह न्यूज -:-जामनेर तालुक्यातील पाळधी येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेने शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखत यंदाच्या इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत शाळेतील तब्बल ७ विद्यार्थी पात्र ठरल्याने गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शाळेच्या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत – लक्ष्मी मुरलीधर सुरवाडे, मनश्री भूषण पाटील, श्रद्धा रवींद्र क्षीरसागर, माधवी मनीषा बारी, पूर्वी विलास मुंढे, राखी योगेश्वर परदेशी आणि श्रद्धा बाळू बोरसे.

या विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेतील शिक्षकांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन, मुख्याध्यापकांचे प्रभावी नेतृत्व, पालकांचे प्रोत्साहन आणि विद्यार्थ्यांची चिकाटी यांचा मोठा वाटा असल्याचे मानले जात आहे.

शाळेत नियमित सराव परीक्षा, गुणवत्तावाढ उपक्रम, वैयक्तिक मार्गदर्शन आणि अभ्यासातील सातत्य यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. त्याचाच परिपाक म्हणून शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेत हे दैदिप्यमान यश मिळवले आहे.

या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापकांनी सर्व पात्र विद्यार्थ्यांचे, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे तसेच पालकांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गावातील नागरिक, शिक्षणप्रेमी आणि माजी विद्यार्थ्यांनीही विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव करत त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

पाळधी जिल्हा परिषद केंद्रशाळेच्या या उल्लेखनीय यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील गुणवत्तेच्या जोरावर मोठी भरारी घेऊ शकतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून शाळेच्या या यशाने जामनेर तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे.



Post a Comment

0 Comments