दिशा लाईव्ह न्यूज --::-- येथे जळगाव छत्रपती संभाजी नगर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या नाली वरील ढापा तुटल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे .
त्याबाबत सविस्तर वृत्त असे की, पहूर येथे जळगाव छत्रपती संभाजी नगर राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या नाली वरील ढापा गेल्या सात-आठ दिवसापासून तुटला असून येथूनच संतोषी माता नगर कडे जाणारा रस्ता असल्याने व येणारा जाणाऱ्यांची तसेच वाहनांची नेहमीच या ठिकाणी वर्दळ असल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान काल दुपारी ढापा तुटून पडलेल्या गड्ड्यात एक जण पडल्याने जखमी झाला आहे.
तरी संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित नाली वरील तुटलेल्या ढाप्याची दुरुस्ती करावी व भविष्यात होणाऱ्या अपघाताची शक्यता कमी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Post a Comment
0 Comments