दिशा लाईव्ह न्यूज :-: १५ ऑगस्ट रोजी काकनबर्डी येथे करण्यात आलेल्या वृक्षारोपणानंतर या रोपांचे संगोपन व संवर्धन करण्यासाठी आज, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी, स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. वृक्षारोपण केलेल्या सुमारे २४० रोपांना नियमित पाणी मिळावे, यासाठी पाइपलाइन टाकून ठिबक सिंचनाची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे प्रत्येक रोपापर्यंत ठिबकद्वारे पाणी पोहोचविण्यात आले.
हा उपक्रम खंडेराव देवस्थान काकनबर्डी, ओझर क्षत्रिय ग्रुप पाचोरा, अरमान फाउंडेशन पाचोरा, एम. के. अॅग्रो प्रॉपर्टी लिमिटेड नाशिक, ग्रीन अर्थ फाउंडेशन पाचोरा, नंदकिशोर पाटील इलेक्ट्रिकल्स खेळगाव, गोतावळा ग्रुप, शारदाई गोविंद समर्थ खेळगाव, ओझर ग्रामपंचायत ग्रुप, ओझर व अंतुर्ली विकास सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला.
वृक्षारोपण करून थांबण्याऐवजी लावलेल्या रोपांची नियमित देखभाल आणि पाण्याची व्यवस्था करणे हा या उपक्रमाचा विशेष महत्त्वाचा भाग ठरला. उन्हाळा तसेच पावसाच्या अनिश्चिततेच्या काळात रोपांना आवश्यक पाणी मिळावे, यासाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था करण्यात आल्याने वृक्षसंवर्धनाला मोठी मदत होणार आहे.
यावेळी खंडेराव महाराज देवस्थान येथे नंदकिशोर पाटील, खेळगाव यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले.
या प्रसंगी खलील दादा देशमुख, पप्पू राजपूत, गणेश पाटील (सभापती, मार्केट कमिटी), नंदू पाटील, बालाजी ग्रुप, सतीश बाप्पू शिंदे, फहम शेख, संजय पाटील, शैलेंद्र पाटील, मंगेश समवंशी, सोपनील राजपूत, नंदकिशोर पाटील, परमेश्वर पाटील, सुधाकर पाटील, अजाबराव पाटील, भरत पाटील, भगवान पाटील, शांताराम पाटील, पप्पू जाधव, संदीप शाहापुरे, किशोर पुराणिक, संजय कानडे, अमोल जाधव, सुधीर वारुळे, सुकदेव सोनवणे, सरफराज पिजारी, हेमराज पाटील, विजय पाटील, बंडू ढमाले, रविंद्र मोरे, ज्ञानेश्वर पाटील, नितीन पाटील, अनिल परदेशी, सतीश परदेशी, अॅड. नवीन तसेच पत्रकार बांधव भुवनेश दुसाने, किशोर रायसाकडा, मिलिंद सोनवणे, चिंतामण पाटील, नंदू शेलकर, अनिल आबा एवले आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
“वृक्ष लावणे ही सुरुवात, तर त्यांचे संगोपन करणे ही खरी जबाबदारी” या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. लावलेल्या २४० रोपांना ठिबकद्वारे पाणी मिळणार असल्याने त्यांची वाढ चांगली होऊन भविष्यात काकनबर्डी परिसर अधिक हिरवागार होण्यास हातभार लागणार आहे.




Post a Comment
0 Comments